कंगणा राणौत म्हणतेय,झगा मगा मलाच बघा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 17:10 IST
तिची प्रत्येक अदा करतेय घायाळ... तिचा अंदाजही आहे निराळा...मात्र आता आपल्या विचित्र ड्रेसिंग स्टाइलने ती ठरतेय लक्षवेधी कारण यावेळी ...
कंगणा राणौत म्हणतेय,झगा मगा मलाच बघा!
तिची प्रत्येक अदा करतेय घायाळ... तिचा अंदाजही आहे निराळा...मात्र आता आपल्या विचित्र ड्रेसिंग स्टाइलने ती ठरतेय लक्षवेधी कारण यावेळी ती म्हणते झगा मगा मलाच बघा ती अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे बॉलिवूड क्वीन कंगणा राणौत.एरव्ही कंगनाचा सिनेमातील लूक असो किंवा मग इतर कार्यक्रमांमध्ये तिची उपस्थिती असो कंगनाचा प्रत्येक अंदाज तुम्हाला घायाळ करेल.कंगणाची ड्रेसिंग, स्टाईल, हेअर स्टाईल या सगळ्याची कायमच चर्चा होत असते.कधी कधी तर एकाच दिवशी असलेल्या दोन दोन कार्यक्रमात तिचा लूक पूर्ण वेगळा असल्याचंही पाहायला मिळालंय.मात्र आता एअरपोर्टवर कंगणाचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. या फोटोत दिसणारा कंगणाचा हा अंदाजही तितकाच निराळा आहे. एअरपोर्टवर कंगणा दिसताच मीडियाच्या नजराही तिच्यावरच खिळल्याचे पाहायला मिळाले. कारण यावेळी घायाळ करणा-या अदा नाहीतर तिची फॅशन स्टेटमेंट पूर्ण निराळीच असल्याची प्रचिती आली. ज्यांनी ज्यांनी कंगणाला तिच्या या फ्लोरल ड्रेसमध्ये पाहिले त्यांना ही कंगना आहे ना असा प्रश्नच पडला.तिला पाहताच उपस्थितांना आपसुकच झगा मगा मला बघा हाच सुर आवळल्याचे पाहायला मिळाला. तिचा हा लूक नक्कीच एखाद्या क्वीनला साजेसा नव्हता. एरव्ही रूपेरी पडद्यावर वेगवेगळे लूकनं फॅन्सची मनं जिंकत असताना कंगणाच्या हॉट आणि सेक्सी भूमिकांचीही तितकीच चर्चा झाली.... 'शूट आऊट एट वडाळा', 'रास्कल्स', 'नो प्रॉब्लेम','नॉक आऊट' या सिनेमातल्या अदांनी फॅन्स क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाहीतर 'रज्जो' बनून केलेला मुजरा असो किंवा तिच्या जुल्मी अदा... फॅन्ससह क्रिटीक्सनीही भरभरून कंगणाचं कौतुक केले होते. विशेष म्हणजे 'क्रिश-3'च्या कायाची कायाही रसिकांना चांगलीच भावली.मात्र सध्या कंगणाच्या लूकला घेवून चर्चा होत असताना बॉलिवूडच्या क्वीनची जादू कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.