Kangana Ranaut Review Dhurandhar 2 : दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे. या चित्रपटाचं कौतुक एस.एस. राजामौली, राम गोपाल वर्मा आणि अनुपम खेर यांसारख्या दिग्गजांनीही केलं आहे. आता या यादीत अभिनेत्री-राजकारणी कंगना रणौतचीही भर पडली आहे. कंगना रणौतनं या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
कंगना रणौतने आदित्य धरच्या कामाचं कौतुक केलं आहे. कंगना म्हणाली, "धुरंधरच्या यशातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आदित्य धर आता स्वतः एक सुपरस्टार दिग्दर्शक बनला आहे. हॉलिवूडमध्ये दिग्दर्शक हे अनेकदा कलाकारांपेक्षा मोठे असतात, जसे स्टीवन स्पीलबर्ग, क्वेंटिन टॅरँटिनो , ख्रिस्तोफर नोलन".
कंगनाने पुढे म्हटलं की, "आपण आपल्या चित्रपट निर्मात्यांना पुरेसा आदर किंवा श्रेय कधीच देत नाही. त्यांच्याकडून गरजेपेक्षा जास्त काम करून घेतले जाते, त्यांना कमी पगार मिळतो आणि सुपरस्टार्सकडून त्यांचा छळ केला जातो. याचा परिणाम म्हणून, मला असा एकही तरुण भेटत नाही, जो चित्रपट निर्माता, छायाचित्रकार किंवा इतर कोणताही तंत्रज्ञ बनण्याचे स्वप्न पाहतो".
दरम्यान, 'धुरंधर: द रिव्हेंज'मध्ये रणवीर सिंहने भारतीय गुप्तहेर हमजा अली मझारीची भूमिका साकारली आहे. ज्याचा भूतकाळ 'जसकिरत सिंह रंगी' म्हणून दाखवण्यात आला आहे. पाकिस्तानी गुंड रहमान डकैतला संपवल्यानंतर हमजा लियारीचा कारभार सांभाळतो. आपल्या देशावरील हल्ल्यांचा एक-एक करुन बदला घेतो. या चित्रपटात राकेश बेदी, अर्जून रामपाल, संजय दत्त, सारा अर्जून, दानिश पंडोर आणि दानिश इकबाल या कलाकारांनी उत्तम व्यक्तीरेखा साकारली आहे. 'धुरंधर'च्या पहिल्या भागाही जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमवलेला. आता तो अपेक्षित प्रतिसाद 'धुरंधर २'लाही मिळत आहे. चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडत कोट्यवधी रुपये कमावले
Web Summary : Kangana Ranaut lauded Aditya Dhar's 'Dhurandhar 2' success, comparing him to Hollywood directors. She highlighted the need to respect and fairly compensate filmmakers, noting their crucial role. The film stars Ranveer Singh and features a stellar cast, continuing the franchise's box office success.
Web Summary : कंगना रनौत ने आदित्य धर की 'धुरंधर 2' की सफलता की सराहना की, उनकी तुलना हॉलीवुड निर्देशकों से की। उन्होंने फिल्म निर्माताओं को सम्मान और उचित मुआवजा देने की आवश्यकता पर प्रकाश डाला, उनकी महत्वपूर्ण भूमिका पर ध्यान दिया। फिल्म में रणवीर सिंह और एक शानदार कलाकार हैं, जो फ्रैंचाइज़ी की बॉक्स ऑफिस सफलता को जारी रखते हैं।