Join us  

सलमान खानच्या सुरक्षेवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, " पंतप्रधानांच्या हातात देश..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 12:30 PM

कंगना नुकतीच हरिद्वारला दर्शनाला गेली होती.

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. तसंच सरकारच्या बाजूने ती कायम वक्तव्य करते. कंगना नुकतीच हरिद्वारला दर्शनाला गेली होती. दर्शन झाल्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. सलमान खानच्या सुरक्षेबाबत तिने यावेळी एक विधान केलं ज्यामुळे सर्वांचंच लक्ष वेधलं.

सलमान खानला सध्या मिळात असलेल्या धमक्या आणि भारतापेक्षा दुबई सुरक्षित असल्याच्या त्याच्या वक्तव्यावर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, "आपले पंतप्रधान, गृहमंत्री दिग्गज आहेत सलमानला केंद्राची सुरक्षा मिळाली आहे. ज्यांची रक्षा स्वयं नरेंद्र मोदीजी करत आहेत मलाही धमकी मिळाली तेव्हा सुरक्षा मिळाली होती मग जर देश चांगल्या हातात आहे तर चिंता करण्याची काय गरज आहे."

कंगना सध्या धार्मिक दौऱ्यावर आहे. रविवारी ती हरिद्वारला दर्शनासाठी आली होती. यानंतर ती केदारनाथलाही जाणार आहे.  कंगनाचा 'इनर्जन्सी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. तसंच अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मनिषा कोईराला हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :कंगना राणौतसलमान खाननरेंद्र मोदीअमित शाह