Join us

कंगना रानौतचा नसीरूद्दीन शाह यांना टोमणा, 'इतक्या महान कलाकाराच्या शिव्याही प्रसादासारख्या'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 17:19 IST

अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं. ते इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाले की, बॉलिवूडमध्ये मुव्ही माफियासारखं काहीही नाही. या गोष्टी काही रचनात्मक मेंदूंच्या काल्पनिक कथा आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिज्म, बॉलिवूड माफिया आणि इनसायडर-आउटसायडरवरून वाद पेटलाय. यावर काही कलाकारांनी आपलं समर्थन दिलंय तर काहींनी अशा काही गोष्टी नसल्याचं सांगितलं. अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं. ते इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाले की, बॉलिवूडमध्ये मुव्ही माफियासारखं काहीही नाही. या गोष्टी काही रचनात्मक मेंदूंच्या काल्पनिक कथा आहेत.

नसीरूद्दीन शाह यांच्या या वक्तव्यावरून अभिनेत्री कंगना रानौत ने त्यांना टोमणा मारलाय. ती ट्विटरवर म्हणाली की, 'इतक्या महान कलाकाराच्या शिव्याही प्रसादासारख्या आहेत. नसीरजी एक महान कलाकार आहेत. इतके महान कलाकार की, त्यांच्या शिव्याही देवाच्या प्रसादासारख्या आहेत. यापेक्षा मी त्यांच्यासोबत सिनेमा आणि गेल्यावर्षी आमच्या क्राफ्टवर झालेलं शानदार कन्व्हर्सेशन बघणं पसंत करेन. जेव्हा तुम्ही म्हणाले होते की, तुम्हाला माझं काम किती आवडतं'.

एका दुसऱ्या ट्विटमध्ये कंगना म्हणते की, 'धन्यवाद नसीर जी, तुम्ही माझ्या सर्व अवॉर्ड आणि उपलब्धींची तुलना केली. जे नेपोटिज्मच्या स्केलवर माझ्या कोणत्याही समकालीन प्रतिद्वंदीकडे नाहीत. मला याची सवय झाली आहे. पण मी जर प्रकाश पादुकोन किंवा अनिल कपूरची मुलगी असती तर तुम्ही मला असच म्हणाले असते का'?

नसीरूद्दीन शाह म्हणाले होते की, 'सुशांत सिंह राजपूत केसमध्ये काही मीडिया हाऊसेस द्वारे केली जाणारी असंवेदनशील मीडिया कव्हरेज सुरू आहे आणि यात असे काही लोक आहेत ज्यांना वाटतं की, ते सुशांतला न्याय देण्यासाठी युद्ध लढत आहे. हा मुर्खपणा आहे. मी हे कधीच फॉलो केलं नाही'.

हे पण वाचा :

करण जोहरकडून पद्मश्री काढून घेण्याची कंगणाने केली विनंती, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

‘मुव्ही माफिया’ सारखे काहीही नाही, सगळ्या काही मेंदूंनी रचलेल्या काल्पनिक कथा ...! नसीरूद्दीन शाह बोलले

हीच तुझी धर्मनिरपेक्षता का? कंगना राणौत आमिर खानवर बरसली

टॅग्स :कंगना राणौतनसिरुद्दीन शाहबॉलिवूड