हीच तुझी धर्मनिरपेक्षता का? कंगना राणौत आमिर खानवर बरसली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 10:32 AM2020-08-18T10:32:05+5:302020-08-18T10:33:10+5:30

आमिर खान तुर्कीच्या फर्स्ट लेडीला भेटल्यामुळे  त्याच्यावर टीकेचा भडीमार होतोय. अशात कंगनानेही आमिरला फैलावर घेतले.

kangana ranaut team shares an old interview of aamir khan and questioned the actor on his take on secularism | हीच तुझी धर्मनिरपेक्षता का? कंगना राणौत आमिर खानवर बरसली

हीच तुझी धर्मनिरपेक्षता का? कंगना राणौत आमिर खानवर बरसली

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या रविवारी आमिर खानने तुर्कीच्या फर्स्ट लेडी एमीन इर्दोगान यांची भेट घेतली होती. एमीन यांनी सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर केले होते. यानंतर आमिर ट्रोल होतोय.

आपल्या परखड बोलण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणौत आता आमिर खानवर घसरलीय. आमिर खान तुर्कीच्या फर्स्ट लेडीला भेटल्यामुळे  त्याच्यावर टीकेचा भडीमार होतोय. अशात कंगनानेही आमिरला फैलावर घेतले. आमिरच्या एका व्हिडीओवरून तिने त्याला लक्ष्य केले.
एका जुन्या मुलाखतीत आमिर मुस्लिम धर्मावर बोलला होता. हिंदुत्वाकडे माझा कल असला तरी माझ्या मुलांना मात्र मी संपूर्ण सक्तीने इस्लाम फॉलो करण्याचा सल्ला देतो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही आपआपल्या पद्धतीने जगतो. आम्ही दोघेही एकमेकांवर आमचे धर्म थोपत नाही. मात्र माझ्या मुलांनी मुस्लिम धर्म फॉलो करावा, हे मी नेहमी स्पष्टपणे सांगितले आहे, असे आमिर या मुलाखतीत एका प्रश्नावर उत्तर देताना म्हणतोय.
कंगनाने नेमक्या त्याच्या याच मुलाखतीवरून त्याला लक्ष्य करत ट्वीट केले आहे.

‘हिंदू + मुस्लिम = मुस्लिम. हा तर कट्टरवाद आहे. दोन वेगवेगळ्या धर्मात लग्न करण्याचा अर्थ हा होत नाही की जीन्स आणि रितीरिवाजांचे मिलन होईल. दुस-या धर्माच्या व्यक्तिसोबत लग्न करण्याचा अर्थ खरे तर दोन धर्मांचे मिलन असा होता. मुलांना अल्लाची इबादतही शिकवा आणि श्रीकृष्णाची भक्तीही. हीच धर्मनिरपेक्षता आहे ना?’, असे एका ट्वीटमध्ये कंगनाने लिहिले.

 ‘हिंदू आईची मुले ज्यांच्या नसांमध्ये श्रीकृष्ण, श्रीरामाचे रक्त वाहते. सनातन धर्म, भारतीय संस्कृतीचा ज्यांना वारसा लाभलाय, त्या हिंदू आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांनी केवळ आणि केवळ इस्लाम धर्म का फॉलो करावा? असे का? असा सवाल अन्य एका ट्वीटमध्ये तिने केला.

आमिर होतोय ट्रोल

गेल्या रविवारी आमिर खानने तुर्कीच्या फर्स्ट लेडी एमीन इर्दोगान यांची भेट घेतली होती. एमीन यांनी सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर केले होते. यानंतर आमिर ट्रोल होतोय. तुर्कीची फर्स्ट लेडी आणि आमिरच्या भेटीवर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली. याचे कारण म्हणजे, तुर्कीचा पाकिस्तानला असलेला पाठींबा.  देशात जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवताना त्याचा विरोध करणाºयात तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीन ईर्दोगान आघाडीवर होते. त्यांनी जाहिरपणे पाकिस्तानला पाठींबा दिला होता. तुर्कस्थानचे अध्यक्ष खुलेआम पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरवरून होत असणा-या वादात पाकिस्तानची बाजू घेत असतना आमिरने या या अध्यक्षांच्या पत्नीला भेटणे अनेकांना खटकले.  यावरून अनेकांनी आमिरला ट्रोल केले. 


 

Web Title: kangana ranaut team shares an old interview of aamir khan and questioned the actor on his take on secularism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.