Join us

घराची सफाई करताना दिसली कंगना, म्हणाली, २०२१ मध्ये क्वीनसारखी एन्ट्री घेणार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 10:40 IST

२०२० वर्षाच्या शेवटच्या दिवशी कंगना रणौत तिचं वार्डरोब आणि घर स्वच्छ करण्यात बिझी होती. कंगनाने तिचं कॅबिनेट स्वच्छ करतानाचा फोटो शेअर केला आहे.

2020 संपला आणि २०२१ ला सुरूवात झाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाला अनेकांनी सुरूवातही केली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. कुणी बाहेर गेले तर कुणी घरीच एन्जॉय केलं. मात्र कंगना रणौतने पार्टी न करता घराची साफ-सफाई करणं पसंत केलं. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.

२०२० वर्षाच्या शेवटच्या दिवशी कंगना रणौत तिचं वार्डरोब आणि घर स्वच्छ करण्यात बिझी होती. कंगनाने तिचं कॅबिनेट स्वच्छ करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती तिचे शेकडो सॅंडल, शूज स्वच्छ करताना दिसत आहे.

आपल्या या फोटोसोबत तिने लिहिले की, 'जेव्हापासून मी घरी परतली आहे तेव्हापासून फक्त सफाईच करत आहे. असे म्हणतात की, ज्या वस्तू तुमच्या असतात, त्यांच्या तुम्हीही असता. आपल्या सामानाची सतत सफाई केल्यावर मला जाणीव झाली की, जशी मी त्यांची गुलाम आहे. आशा आहे की, आज माझं काम संपेल आणि २०२१ मध्ये मी एका क्वीनसारखी एन्ट्री घेईन'.

कंगना रणौत नुकतीच मुंबईला परतली आहे. ती यावर्षी कोरोना व्हायरसमुळे बरेच दिवस मनालीच्या घरी होती. पण ती आता परतली आहे. मुंबईत येताच तिने आधी सिद्धीविनायक मंदिर आणि मुंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. ती लवकरच 'धाकड' सिनेमाचं शूटींग सुरू करणार आहे. त्यासोबतच कंगना 'थलायवी' आणि 'तेजस' सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसोशल मीडिया