Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कंगना राणौतला भासू लागली जोडीदाराची उणीव! पुढीवर्षी फेब्रुवारीत वाजणार सनई चौघडे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 10:31 IST

बॉलिवूड क्वीन कंगना राणौत तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतेच. पण त्याहीपेक्षा अधिक तिच्या वादांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधल्या फार कमी लोकांसोबत ...

बॉलिवूड क्वीन कंगना राणौत तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतेच. पण त्याहीपेक्षा अधिक तिच्या वादांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधल्या फार कमी लोकांसोबत तिचे पटते आणि अनेकांसोबत कायम वाजते. ‘क्वीन’,‘सिमरन’,‘तनु वेड्स मनु’ अशा अनेक चित्रपटांतील शानदार अभिनयासाठी कंगना ओळखली जातेच. पण या चित्रपटांतील ‘धाकड’ भूमिकेइतकीच कंगनाच्या खासगी आयुष्यातही  उलथापालथ सुरु असते. कंगनाचे नाव अनेकांसोबत जोडले गेले. सर्वप्रथम आदित्य पांचोली, मग अध्ययन सुमन. पुढे हृतिक रोशन व कंगनाचा एक अध्याय गाजला. या सगळ्या रिलेशनशिपदरम्यान कंगना बरीच चर्चेत राहिली. पण कदाचित आता कंगनाने रिलेशनशिपबद्दल गंभीर व्हायचे ठरवलेले दिसतेय. होय, ताज्या मुलाखतीत कंगना जे काही बोलली त्यावरून तरी तेच वाटतेय. या मुलाखतीत  कंगना तिच्या लग्नाबद्दल बोलली. होय, पुढील वर्षी फेबु्रवारीत कंगना लग्नबंधनात अडकू शकते. खुद्द कंगनानेचं याबद्दल सांगितले. अर्थात तिचा वर कोण, याबद्दल मात्र तिने बोलणे टाळले. प्रत्येकाच्या आयुष्यावर अनेक टप्पे येतात. तारूण्यात प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे हवेसे वाटते. या काळात व्यक्ती स्वमर्जीने निर्णय घेऊ इच्छिते. स्वत:च्या आयुष्यात या काळात कुणाचीही दखल नकोशी होते. पण एका वळणावर, खरी सोबत महत्त्वाची ठरते. माझ्या भावाने लग्न झालेय. माझी बहीण आई झालीय. माझ्यामते, माझ्यासाठीही लग्नाची योग्य वेळ आलीय, असे कंगना यावेळी म्हणाली. मी पुढील वर्षात फेब्रुवारीत लग्न करू शकते,असे संकेतही तिने दिलेत. आता खरचं कंगना फेब्रुवारीत लग्न करणार असेल तर तिला सोबत देणारा ‘तो’ जोडीदार कोण? हे पाहणे इंटरेस्टिंग ठरेल.ALSO READ : पहिल्यांदा बॉलिवूड पार्टीमध्ये पोहोचली कंगना राणौत! तुम्हीही जाणून घ्या कारण!!गतवर्षी कंगना लग्न करणार, अशी चर्चा होती. खरे तर त्याहीवेळी कंगनानेच स्वत:च याबद्दलचे संकेत दिले होते.  अर्थात गतवर्षी कंगनाच्या लग्नाचा योग चुकला. पण येत्या वर्षांत मात्र कंगना लग्नगाठ बांधणार, असे दिसतेय. तूर्तास कंगना ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटानंतर कंगना  दिग्दर्शन क्षेत्रात उतरणार अशी चर्चा आहे.