Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या राजकारणात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 06:41 IST

शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर हे माझे शेजारी आहेत. मात्र, अनेक वर्षांनंतर आज त्यांना भेटण्याचाही योग आला, असे कंगना म्हणाली.

- बलवंत तक्षक लोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मंगळवारी सकाळी कंगना रनौत यांच्या घरी जाऊन चर्चा केली. ठाकूर हे जवळपास अर्धा तास त्यांच्या निवासस्थानी होते. त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर हेही उपस्थित होते. 

मुख्यमंत्री ठाकूर यांनी मनालीतील सिमला स्थित कंगना यांच्या घरी नाश्ताही केला. कंगना यांच्या आईने बनविलेले पदार्थ बबरू आणि भल्ले ठाकूर यांनी आवडीने खाल्ले. या भेटीची छायाचित्रे कंगना यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. कंगना यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा साधेपणा आणि प्रेम भावना दोन्हीही प्रेरणादायक आहे. कंगना यांनी असेही म्हटले आहे की, शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर हे माझे शेजारी आहेत. मात्र, अनेक वर्षांनंतर आज त्यांना भेटण्याचाही योग आला. मुख्यमंत्री ठाकूर यांनी म्हटले आहे की, कंगना यांच्या निमंत्रणावरूनच त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी यापूर्वीही अनेकदा घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. 

टॅग्स :कंगना राणौत