Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! कंगना रणौत आणि महेश भट्टच्या 'त्या' व्हायरल फोटोने खळबळ, राखी सावंत म्हणाली.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 11:22 IST

कंगना रणौत गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचं केंद्र बनली आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ती सतत चर्चेत आहे. अशात कंगनाचा एक फोटो सोशल मीडियात फारच व्हायरल झालाय. ज्यात ती महेश भट्ट यांच्यासोबत दिसत आहे.  

बॉलिवूडमध्ये जणू एखादं वादळ आलंय. दररोज नवीन वाद समोर येत आहेत. दोन भागात इंडस्ट्री विभागली गेलीये. कधी नेपोटिज्मवर वाद होत आहे तर कधी मुव्ही माफियावर. कंगना रणौत गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचं केंद्र बनली आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ती सतत चर्चेत आहे. अशात कंगनाचा एक फोटो सोशल मीडियात फारच व्हायरल झालाय. ज्यात ती महेश भट्ट यांच्यासोबत दिसत आहे.  

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर सिने दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या लोकांनी निशाणा साधला होता. कंगना सुरूवातीपासून नेपोटिज्मवरून करण जोहरसारख्या इतरही लोकांवर आरोप लावत आली आहे. अशात कंगना आणि महेश भट्ट यांचा हा व्हायरल फोटो कंट्रोवर्सी क्वीन राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. तिने याला कॅप्शन दिलंय 'सुशांतच्या केसमध्ये नवं वळणं आलं'.

दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणी महेश भट्ट यांची पोलिसांनी चौकशी केली होती. लोकांनी या घटनेनंतर आलिया भट्टसहीत अनेक कलाकारांवर नेपो किड्स म्हणून टीका केली होती. कंगनाने बॉलिवूडमधील इनसाइड स्टोरी सांगून खळबळ उडवू दिली होती.

ही पहिली वेळ नाही की, राखी सावंतने कंगनावर निशाणा साधला. राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत कंगना रनौतला चक्क भीकारी म्हटलंय. इतकेच नाही तर ती म्हणाली की, मुंबई जर पीओकेसारखी वाटते तर परत इथे का आली?

'भिकारी कंगना'

राखी सावंत म्हणाली की, कंगनाने तिच्या हिमाचलमधील घरीच रहायचं पाहिजे होतं. राखी सावंतने यात कंगनाबाबत अनेक गोष्टी केल्या आहेत. पण राखीचं कंगनाला अशाप्रकारे भीकारी म्हणणं कंगनाच्या फॅन्सना पसंत पडलेलं दिसत नाही. राखी सावंतने शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ६० हजारपेक्षा जास्त वेळ बघण्यात आलाय.

राखीने आधीही केली होती टीका

याआधीही राखी सावंतने कंगनावर निशाणा साधला होता. राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती म्हणाली होती की, कंगनासोबत जे काही होत आहे ते चांगलं होत आहे. राखी सावंतच्या या व्हिडीओत कमेंटबॉक्समध्ये कंगनाचे फॅन्स राखीवर टीका करत आहेत.

राखी सावंतची 'सटकली', कंगनाला भिकारी म्हणाली... पाहा व्हिडीओ

VIDEO : कंगनावर राखी सावंतने केली टीका, लोक म्हणाले - तुझं डोकं ठिकाणावर नाही'

टॅग्स :राखी सावंतकंगना राणौतबॉलिवूडमहेश भट