Join us

जया बच्चन यांनी चाहत्याला दिलेला धक्का पाहून संतापली कंगना, म्हणाली- "बिग बींची पत्नी आहे म्हणून.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:29 IST

Jaya Bachchan And Kangana Ranaut : ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये त्या सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चाहत्याला धक्का देताना दिसत आहेत. आता अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौतने या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये त्या सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चाहत्याला धक्का देताना दिसत आहेत. आता अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत(Kangana Ranaut)ने या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. जया बच्चन यांच्या या वागण्यावर ती संतापलेली दिसत आहे. कंगनाने ज्येष्ठ अभिनेत्रीला 'बिघडलेली महिला' असे संबोधले आहे आणि म्हटले आहे की लोक तिला फक्त अमिताभ बच्चन यांची पत्नी असल्यामुळे सहन करतात.

कंगना राणौतने इन्स्टाग्राम स्टोरीवर जया बच्चन यांचा एका व्यक्तीला धक्का देतानाचा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की,''त्या एक अतिशय बिघडलेल्या आणि विशेषाधिकारप्राप्त महिला आहेत. लोक त्यांचा राग आणि मूर्खपणा फक्त अमिताभ बच्चन यांची पत्नी असल्याने सहन करतात. ही समाजवादी टोपी कोंबड्याच्या कंगव्यासारखी दिसते, तर त्यादेखील कोंबडीसारखी दिसत आहेत. किती अपमानजनक आणि लज्जास्पद आहे.'

जया यांनी सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला ढकललेदिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक चाहता त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा जया त्या व्यक्तीवर संतापून स्वतःपासून दूर ढकलते. यानंतर जया बच्चन त्या व्यक्तीकडे रागाने पाहतात आणि म्हणतात, ''तू काय करतोयस? हे काय आहे?''

जया बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावरजया बच्चन यांच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटिझन्सही प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, ''त्या प्रसिद्धी आणि पब्लिसिटीच्या लायक नाहीत.'' दुसऱ्या व्यक्तीने म्हटलं, ''असह्य, त्यांना सार्वजनिक ठिकाणी वागण्याचे काही शिष्टाचार शिकण्याची आवश्यकता आहे. लज्जास्पद कृत्य.'' याशिवाय आणखी एकाने लिहिले, ''जर त्यांना सार्वजनिक जीवनात राहायचे असेल तर लोक असे फोटो काढायला येतील. पण त्यांचे वर्तन खूप असभ्य आणि अमान्य आहे.'' 

टॅग्स :कंगना राणौतजया बच्चन