Join us
Daily Top 2Weekly Top 5

​वाढदिवशी कंगना राणौतने स्वत:ला दिली ‘ही’ सुंदर भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 13:41 IST

वाढदिवसाला गिफ्ट नाही तर मज्जाच नाही. या दिवशी इतरांकडून मिळणाºया गिफ्टची गोष्टच काही न्यारी. पण कंगना राणौत हिच्याबद्दल हे ...

वाढदिवसाला गिफ्ट नाही तर मज्जाच नाही. या दिवशी इतरांकडून मिळणाºया गिफ्टची गोष्टच काही न्यारी. पण कंगना राणौत हिच्याबद्दल हे थोडे उलटे आहे. तशीही कंगना आहेच सगळ्यांपेक्षा न्यारी. मग याबाबतीत तिने इतरांसारखे का असावे? आता आम्ही कशाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला सांगितलेच पाहिजे. आम्ही बोलतोय ते कंगनाने स्वत:च स्वत:लाच दिलेल्या गिफ्टबद्दल. होय, अलीकडे कंगनाचा ३० वा वाढदिवस झाला. मग काय, कंगनाने स्वत:च स्वत:ला वाढदिवसाचे गिफ्ट देऊन टाकले. हे गिफ्ट म्हणजे काय, तर एक सुंदरचा बंगला. हा बंगला आहे, मुंबईतील खार भागात. पण याचे वैशिष्ट्य म्हणजे, या बंगल्यात गेले की तुम्हाला मनालीत असल्याचा फिल येतो. म्हणजे, स्टोन फ्लोरिंग, झोपडीसारखे छत. कंगनाचा हा बंगला तीन मजली आहे. यात कंगनाचे आॅफिसही असणार आहे. शबनम गुप्ताकडून कंगनाने याचे इंटीरियर करून घेतले आहे. कंगनाला भविष्यात दिग्दर्शन करायचे आहे. निर्माती बनण्याचीही तिची इच्छा आहे. यासाठी स्वत:चे आॅफिस असावे, अशी तिची इच्छा होती. आता कंगनाची ही इच्छा पूर्ण झाली आहे.ALSO READ : पटत नाही तर बॉलिवूड सोड...करण जोहरने घेतला कंगना राणौतचा बदला!!अलीकडे कंगनाचा ‘रंगून’ हा सिनेमा येऊन गेला. अर्थात या सिनेमाने प्रेक्षकांची काहीसी निराशा केली. सध्या कंगना ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात ती राणी लक्ष्मीबाई अर्थात झाशी की राणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा प्रोजेक्ट संपल्यानंतर कंगना स्वत:च्या प्रोजेक्टची घोषणा करू शकते. अभिनेत्री म्हणून कंगनाची प्रतिभा आपण बघितलीच. साहजिक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून कंगना किती यशस्वी ठरते, ते पाहणे अधिक रोचक ठरणार आहे.