२६/११ अर्थात २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्लात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे १६ जणांना वीरमरण आलं होतं. या घटनेला इतकी वर्षं उलटली, तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात याच्या कटू आठवणी जिवंत आहेत. लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केलं होतं. या भीषण हल्ल्यात कामा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी दशतवाद्यांचा धैर्यानं सामना केला होता आणि रुग्णांचे प्राण वाचवले होते. याच घटनेवर आता कंगना राणौत चित्रपट घेऊन येत आहे.
'भारत भाग्य विधाता' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कंगना एका नर्सच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'व्हरायटी इंडिया'च्या वृत्तानुसार, हा चित्रपट २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा हॉस्पिटलमध्ये (Cama Hospital) घडलेल्या वास्तविक घटनांवर आधारित असेल. जेव्हा दहशतवादी अजमल कसाब आणि इस्माईल खान यांनी रुग्णालयात घुसून धुमाकूळ घातला होता, तेव्हा तिथल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धैर्य या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.
कंगना या चित्रपटात एका स्टाफ नर्सची भूमिका साकारत आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांना ठार मारल्यानंतर आणि अनेक कर्मचाऱ्यांना जखमी केल्यानंतरही, नर्स आणि डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे रक्षण कसे केले, हे या चित्रपटात पाहायला मिळेल. ओळख पटू नये म्हणून खिडक्या-दरवाजे सील करणे, दिवे बंद करणे आणि फोन सायलेंटवर ठेवून रुग्णांना वाचवण्यासाठी केलेली धडपड प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी असेल.
कंगनाचे आगामी प्रोजेक्ट्सकंगना राणौत शेवटची 'इमर्जन्सी' चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसली होती. आता 'भारत भाग्य विधाता' सोबतच ती तिच्या हॉलिवूड पदार्पणासाठीही सज्ज झाली आहे. 'ब्लेस्ड बी द डेव्हिल' (Blessed Be the Devil) या भयपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे.
Web Summary : Kangana Ranaut will portray a nurse in 'Bharat Bhagya Vidhata,' a film based on the 26/11 Mumbai attacks. The movie highlights the bravery of Cama Hospital's staff who risked their lives to protect patients during the terrorist attack. It will showcase the challenges they faced while saving lives.
Web Summary : कंगना रनौत 'भारत भाग्य विधाता' में एक नर्स की भूमिका निभाएंगी, जो 26/11 के मुंबई हमलों पर आधारित है। यह फिल्म कामा अस्पताल के कर्मचारियों के साहस को उजागर करती है, जिन्होंने आतंकवादी हमले के दौरान मरीजों को बचाने के लिए अपनी जान जोखिम में डाल दी। इसमें उनके सामने आने वाली चुनौतियों को दिखाया जाएगा।