Join us
Daily Top 2Weekly Top 5

संसदेतील साडी बदलली अन् शर्ट-टाय घातला! कंगना राणौत AI फोटोवरून भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:50 IST

AI फोटोमुळे कंगना राणौत संतापली, संसदेतील 'त्या' फोटोंवर व्यक्त केली तीव्र नाराजी

Kangana Ranaut Ai Photos Controversy : बॉलिवूडची 'क्वीन' आणि भाजप खासदार कंगना राणौत सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा (AI) वापर करून कंगनाचे काही फोटो बदलण्यात आले, ज्यावर अभिनेत्रीने सडकून टीका केली आहे. "हे अत्यंत अपमानजनक आहे," अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला.

कंगना राणौत जून २०२४ मध्ये मंडी येथून खासदार झाल्यापासून संसदेतील सर्व सत्रांमध्ये साडी परिधान करताना दिसते. मात्र, एआयचा वापर करून नेटकऱ्यांनी तिच्या साडीतील मूळ फोटोंना सूट, शर्ट आणि टाय अशा पाश्चात्य कपड्यांमध्ये बदलण्यात आलं. हे फोटो व्हायरल होताच कंगनाने ते पुन्हा शेअर करत राग व्यक्त केला.

कंगना म्हणाली, "हे खूप चुकीचं आहे. रोज सकाळी उठल्यावर मी स्वतःला एआयने तयार केलेल्या वेगवेगळ्या कपड्यांमध्ये आणि मेकअपमध्ये पाहते. लोकांनी इतरांना कपडे घालणं थांबवावं. कृपया हे एआय एडिटिंग थांबवा आणि मला कसं दिसायचं व काय घालायचं, हे मला निवडू द्या".

आगामी चित्रपट आणि राजकारणकंगना सध्या दुहेरी भूमिका चोख बजावत आहे. राजकारणात ती मंडीची खासदार म्हणून सक्रिय आहे, तर चित्रपटसृष्टीत तिचे अनेक मोठे प्रोजेक्ट्स रांगेत आहेत. शेवटची ती या चित्रपटात ती 'इमर्जन्सी'मध्ये इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली होती. सध्या ती एका सायकोलॉजिकल थ्रिलरवर आर. माधवनसोबत काम करत आहे. तर 'भारत भाग्य विधाता' हा तिचा आणखी एक महत्त्वाकांक्षी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Kangana Ranaut Angered by AI Photo Alterations: Saree to Suit!

Web Summary : Kangana Ranaut condemned AI-altered photos showing her in Western clothes instead of a saree. She expressed outrage at the digital manipulation and asserted her right to choose her own attire. Ranaut is balancing her political career with upcoming film projects.
टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड