Join us

​ कंगनाला हवे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 19:56 IST

कंगना राणौतला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हवे आहे. थांबा, थांबा!! लगेच निष्कर्ष काढू नका. कंगनाला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हवे आहे, ...

कंगना राणौतला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हवे आहे. थांबा, थांबा!! लगेच निष्कर्ष काढू नका. कंगनाला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हवे आहे, यामागचे कारण अतिशय इंटरेस्टिंग आहे. होय, कंगना लवकरच हंसल मेहता यांच्या ‘सिमरन’ या चित्रपटाच्या शूटींगसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. यादरम्यान अमेरिकेत मनासारखी भटकंती करण्याचा कंगनाचा प्लॅन आहे. नवी ठिकाणं, नवे लोक असं काय काय अनुभवायला कंगनाला आवडते. याचाच भाग म्हणून स्वत: ड्राईव्ह करत साइट सीर्इंग करण्याचा कंगनाचा प्लॅन आहे. याचसाठी कंगनाला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हवे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगनाला यासाठीची एनओसी तर मिळाली. पण लायसन्स मिळणे अद्याप बाकी आहे. ‘सिमरन’मध्ये कंगना एनआरआय बँक रॉबरची भूमिका साकारताना दिसणार आहे. लॉस वेगास, नेवादा, सन फ्रान्सिस्को आदी ठिकाणी चित्रपटाचे शूटींग होणार आहे. तेव्हा साइट सीर्इंगसाठी चांगलाच वाव आहे. म्हणजेच काम ते काम आणि सैर ती सैर...होय ना कंगना!!