Join us

रितेश बत्रांच्या चित्रपटासाठी कंगना उत्साहित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 10:42 IST

 ‘रंगून’ चित्रपटाचे शूटींग तर पूर्ण झाले आहे पण, चित्रपट रिलीज होण्याअगोदरची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कंगना राणावत ...

 ‘रंगून’ चित्रपटाचे शूटींग तर पूर्ण झाले आहे पण, चित्रपट रिलीज होण्याअगोदरची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कंगना राणावत आता तिच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. रितेश बत्रा यांच्या आगामी चित्रपटासाठी कंगना फारच उत्साहात आहे.सुत्रांनुसार, मार्चमध्ये ‘झाँसी की रानी’ हा तिचा मेगा प्रोजेक्ट केल्यानंतर कंगना बत्रांच्या चित्रपटाची शूटींग सुरू करणार आहे. रितेश बत्रा यांनी सांगितलेली स्क्रिप्ट तिला खुप आवडली आहे. आणि त्याची शूटींग केव्हा सुरू होणार याकडे ती आता लक्ष लावून बसली आहे.ती म्हणते,‘स्क्रिप्ट वाचल्यापासून मला चित्रपटाची शूटींग करावीशी वाटत आहे. वेल, ती आपल्याला लवकरच शूटींग करताना दिसेल यात काही शंकाच नाही.