Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कंदीलच्या भावाने हत्या करण्यापूर्वी बलात्कार केला असेल- राखी सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 15:36 IST

पाकिस्तानी मॉडेल व अभिनेत्री कंदील बलोचची हत्या तिच्या भावाने केल्याने राखी सावंत याप्रकरणी नाराज होऊन खूच संतापली. एका एंटरटेन्मेंट ...

पाकिस्तानी मॉडेल व अभिनेत्री कंदील बलोचची हत्या तिच्या भावाने केल्याने राखी सावंत याप्रकरणी नाराज होऊन खूच संतापली. एका एंटरटेन्मेंट पोर्टला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘कुणी फक्त अंगप्रदर्शन केल्याने हत्या करीत नाही. या हत्येमागे दुसरेही कारण असू शकते, राखीच्या मते, कंदीलच्या भावाने हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला असेल.ती पूढे म्हणाली की, ‘तिच्या भावाला तिचा जीव घेण्याचा काहीच  अधिकार नव्हता. मला वाटते, पाकिस्तानी पोलिसांनी या प्रकरणाचा बायकाईने चौकशी क रायला हवी. मला नाही वाटत, की केवळ अंगप्रदर्शन केल्याने कुणी हत्या करू शकतो.'- कुराणमध्ये असे कुठेच लिहिलेले नाहीये. मला वाटते, तिच्या भावाने हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला असावा. कंदीलविषयी ऐकून मला फार दु:ख झाले. तिचे भविष्य उज्वल होते. - अनेक अभिनेत्री आहेत, ज्या पाकिस्तानमधून भारतात आल्या. वीणा मलिकसुध्दा आहे. असे कुठे लिहिले आहे, की या तरुणींना जीवन जगण्याचा हक्क नाहीये. लोकांना केवळ आपल्या आयुष्याशी संबंध ठेवता येत नाही का? अनेक तरुणी आहे, ज्या एक्सपोज करतात, त्या वाईट समजल्या जातात का?