श्रुतीच्या करिअरसाठी कमलची धडपड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 16:59 IST
कुण्याही बापाला अपत्याच्या करिअरची काळजी असणारच. चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. सुपरस्टार कमल हसन यांनाही त्यांची लाडकी लेक श्रुती हसन ...
श्रुतीच्या करिअरसाठी कमलची धडपड?
कुण्याही बापाला अपत्याच्या करिअरची काळजी असणारच. चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. सुपरस्टार कमल हसन यांनाही त्यांची लाडकी लेक श्रुती हसन हिच्या करिअरची काळजी सतावू लागली आहे आणि ती साहजिकही आहे. श्रुती ‘वेलकम बॅक’मध्ये दिसली आणि तेव्हापासून जणू दिसेनासी झाली.‘वेलकम बॅक’ बॉक्स आॅफिसवर फारसा प्रभाव दाखवू न शकल्याने सध्या श्रुतीचे बॉलिवूडमधील देऊळ पाण्यात आहे.कमल यांना कदाचित हा अंदाज आला असावा. त्याचमुळे पोरीसाठी काहीतरी करायला हवेच, या हेतूने ते नवा प्रोजेक्ट घेऊन येत आहे. हिंदीमध्ये ‘शाबाश कुडू या चित्रपटात कमल हसन दिसणार आहे. तामिळमध्ये हाच चित्रपट ‘शाबाश नायडू’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रुतीला महत्त्वपूर्ण भूमिका दिली गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल हसन यांनी जातीने लक्ष घालून या चित्रपटाची स्क्रिप्ट नव्याने लिहून घेतली, जेणेकरून श्रुतीची भूमिका अधिकाधिक उठावदार आणि महत्त्वपूर्ण असेल. कमल आणि श्रुती या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच पडद्यावर एकत्र येत आहेत. ‘शाबाश कुडू’मध्ये बहुप्रतिभाशाली अभिनेता सौरभ शुक्ला ब्रह्मानंदमची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या श्रुतीच्या हातात म्हणायला काही तेलूग प्रोजेक्ट आहेत. पण बॉलिवूडमध्ये तगून राहायचे तर हातपाय हलवायला हवेच...पित्यची खटपट श्रुतीच्या किती कामी येते, ते आता बघूच!!