Priyanka Chopra : बी-टाऊनमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रियंका चोप्रा. केवळ बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडमध्येही या अभिनेत्रीने वेगळी ओळख निर्माण केली आहे.आपल्या अभिनयाच्या जादूने अनेक सिनेरसिकांना क्लीनबोल्ड करणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत.या यादीत कमिने चित्रपटाचं नाव घेतलं तर वावगं ठरणार नाही. विशाल भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात शाहिद कपूर आणि प्रियंकाची प्रमुख भूमिका होती. नुकतीच हा चित्रपट प्रदर्शित होऊन १६ वर्षे पूर्ण झाली आहे. याच निमित्ताने अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. शिवाय तिला हा चित्रपट कसा मिळाला याबद्दलही तिने सांगितलं आहे.
दरम्यान, 'कमीने' चित्रपटाला १६ वर्ष पूर्ण होताच अभिनेत्री प्रियंका चोप्राने आनंद खास पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या चित्रपटात तिने साकारलेली स्विटी भोपे आजही प्रेक्षकांच्या आठवणीच्या कप्प्यात कायम आहे.त्या चित्रपटाविषयी सांगताना प्रियंका म्हटलंय,"मी मियामी फ्लोरिडामध्ये 'दोस्ताना' चित्रपटाचं शूटिंग करत होते. दिग्दर्शक तरुण मनसुखानी यांच्या या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम माझ्यासोबत होते.दिग्दर्शक तरुण मनसुखानी यांच्या या चित्रपटात माझ्यासोबत अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम देखील होते."
पुढे अभिनेत्री म्हणाली,"मला आठवतंय, त्याचवेळी या चित्रपटाचं शूटिंग शेड्यूल संपल्यानंतर विशाल भारद्वाजचा मला फोन आला होता.मला त्यांच्यासोबत काम करता यावं अशी खूप इच्छा होती.पण मला वाटलं नव्हतं की ते माझ्या 'व्यावसायिक' (commercial) इमेजमुळे कास्ट ते मला यामध्ये कास्ट करतील. शिवाय, मनात भीती देखील होती. ते म्हणाले की त्यांना मला भेटायचं आहे,म्हणून मी त्यांना माझ्या शूटिंगचं ठिकाण सांगितलं आणि मग ते मियामीला आले.तिथे त्यांनी मला 'कमिने'ची स्क्रिप्ट ऐकवली आणि त्यात माझे फक्त ८ सीन्स असतील असं सांगितलं.पण ते उत्तम पद्धतीने प्रेझेंट केले जातील असं ते म्हणाले. कमिने माझ्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. ही संधी दिल्याबद्दल मी विशाल भारद्वाज उस्ताद यांचा खूप आभारी आहे."त्याचबरोबर प्रियंकाने चित्रपटातील तिच्या सहकलाकारांचं देखील तोंडभरुन कौतुक केलं आहे.
प्रियंका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवत असणारी ही देसी गर्ल सध्या यशाच्या शिखरावर आहे.आपल्या फिल्मी कारकिर्दीत'दोस्ताना','कमीने' 'प्यार इम्पॉसिबल', 'अनजाना अनजानी', '7 खून माफ' हे चित्रपटांमधून देखील अभिनय केला आहे. लवकरच प्रियंका दाक्षिणात्य चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस.एस.राजामौली करणार आहेत.