Join us

कमल हसन यांच्या घरी आग, आगीतून थोडक्यात बचावले कमल हसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 14:54 IST

साउथचा सुपस्टार कमल हसन यांच्या घरी शुक्रवारी रात्री आग लागली. आग लागली त्यावेळी कमल हसन घरातच होता. कमल हसने ...

साउथचा सुपस्टार कमल हसन यांच्या घरी शुक्रवारी रात्री आग लागली. आग लागली त्यावेळी कमल हसन घरातच होता. कमल हसने ने ट्वीट करुन याबद्दलची माहिती आहे. त्यांच्या चेन्नईतील घरी ही आग लागली आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. ‘माझ्या स्टाफचे आभार. घरात लागलेल्या आगीतून सुखरुप माझी सुटका केली. फुफ्फुसांमध्ये धूर भरला आहे. तिसऱ्या मजल्यावरुन खाली आलो. मी सुरक्षित आहे आणि कोणालाही दुखापत झालेली नाही’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे. ‘‘तळमजल्याला आग लागली होती. तिथे एक फ्रीज आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे घरभर धूर पसरला होता’ असं कमल हसन यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आलं. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे ही आग कमल हसनच्या घरी नाही तर त्याच्या शेजारांच्या घरी लागली. शुक्रवारीच कमल हसन यांच्या मुलगी अक्षरा हसन हिचा ‘लाली की शादी में लड्डू दिवाना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.