कमल हासनची एक्स पत्नी झाली बेघर, आमिर खान आला मदतीला धावून!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 18:22 IST
सध्या बॉलिवूड अभिनेत्री सारिका चांगलीच अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यातच सारिकाच्या ५७ वर्षीय आईचे निधन झाले. ...
कमल हासनची एक्स पत्नी झाली बेघर, आमिर खान आला मदतीला धावून!!
सध्या बॉलिवूड अभिनेत्री सारिका चांगलीच अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यातच सारिकाच्या ५७ वर्षीय आईचे निधन झाले. मुंबईमध्ये ज्या फ्लॅटमध्ये सारिकाची आई राहत होती, सध्या त्या फ्लॅटच्या अधिकारावरून वाद सुरू आहे. सारिकानेच तिच्या आईसाठी हा फ्लॅट खरेदी केला होता. मुंबई, जुहू येथील भानू अपार्टमेंट्समध्ये हा फ्लॅट असून, त्याच्या आजूबाजूला अभिनेता विवेक ओबेरॉय आणि गोविंदा वास्तव्यास आहेत. रिपोर्ट्सनुसार, सारिकाने खरेदी केलेल्या या फ्लॅटवर तिच्या आईचादेखील अधिकार होता. त्यामुळे आता बातमी समोर येत आहे की, सारिकाच्या आईने त्यांच्या मृत्युपत्रात हा डॉ. विक्रम ठक्कर यांच्या नावे केला आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार, सारिकाच्या आईने तिला त्यांच्या संपत्तीतून बेदखल केले आहे. तसेच सर्व संपत्ती डॉ. ठक्कर यांच्या नावे केली आहे. वृत्तानुसार सारिका सध्या एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत आहे. सारिका साउथचे सुपरस्टार कमल हासन यांची एक्स पत्नी आहे. घटस्फोटानंतर सारिका मुंबईत स्थायिक झाली, तर सारिकाची मोठी मुलगी श्रुती हासन स्वत:च्या घरात राहत आहे. या व्यतिरिक्त तिची लहान मुलगी अकांक्षा हासन मुंबई ते चेन्नई असे नेहमीच येत-जात असते. दरम्यान, हे सर्व झाल्यानंतर सारिकाने मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याच्याकडे मदत मागितली आहे. सारिका आमिर खानची बहीण म्हणजेच इमरान खानची आई खान नुजहत एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. तिनेच याबाबतची सर्व माहिती आमिर खानच्या कानावर घातली. त्यानंतर सारिकाने आमिरकडे याप्रकरणी मदत करण्याची मागणी केली. डीएनए रिपोर्टनुसार, सारिकाच्या या अडचणीच्या काळात आमिर खान तिच्या पाठीशी उभा राहिला असून, तिला प्रत्येक मदत करण्याचे त्याने आश्वासन दिले आहे.