Join us

लग्नाआधीच आई होणार हे कळल्यावर कल्कीच्या कुटुंबीयांची दिली 'ही' रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 12:10 IST

कल्की एका इस्रायली पियानो वादकासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.

अभिनेत्री कल्की कोचलिन लवकरच बाळाला जन्म देणार आहे. कल्की एका इस्रायली पियानो वादकासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. 'करीना कपूर खानच्या व्हॉट व्हुमन वॉन्ट' या शोमध्ये ती आली होती. यावेळी कल्कीने तिच्या प्रेग्नेंसीबाबत दिलखुलास गप्पा मारल्या. याशिवाय तिच्या प्रेग्नेंसीवर कुटुबीयांची काय रिअॅक्शन होती हेही तिने सांगितले.   

कल्की म्हणाली, माझ्या नशिबाने माझे कुटुंब पारंपारिक विचारसरणीचे नाहीय. माझी आई म्हणाली होती की,पुढच्या वेळी तू लग्न करशील तेव्हा ते आयुष्यभरासाठी आहे याची खात्री करुन घे. असे ती यासाठी म्हणाली कारण माझा एक घटस्फोट झाला आहे. त्यामुळे तिला माझ्या लग्नाची घाई नव्हती.  2009 मध्ये देव डी या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला.

कल्की यावेळी लग्नाबद्दलही बोलली. आम्हाला लग्न करण्यात काहीही अडचण नाही. पण केवळ मी लग्नाआधी प्रेग्नंट आहे म्हणून आम्हाला लग्न करायचे नाही. आमच्या मुलाच्या शाळेसाठी वा कागदपत्रांसाठी गरज असल्यास आम्ही लग्नाबद्दल विचार करू. पण तूर्तास आम्ही एकमेकांशी, आमच्या प्रेमाशी वचनबद्ध आहोत आणि कुटुंबाशीही प्रामाणिक आहोत, असे कल्की म्हणाली.

कल्की लग्नाबद्दलही बोलली. आम्हाला लग्न करण्यात काहीही अडचण नाही. पण केवळ मी लग्नाआधी प्रेग्नंट आहे म्हणून आम्हाला लग्न करायचे नाही. आमच्या मुलाच्या शाळेसाठी वा कागदपत्रांसाठी गरज असल्यास आम्ही लग्नाबद्दल विचार करू. पण तूर्तास आम्ही एकमेकांशी, आमच्या प्रेमाशी वचनबद्ध आहोत आणि कुटुंबाशीही प्रामाणिक आहोत, असे कल्की म्हणाली.

टॅग्स :कल्की कोचलीन