Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ ‘काला चश्मा गँग इज आऊट इन दी ओपन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 19:10 IST

‘बार बार देखो’ या चित्रपटाकडून करण जोहरला बºयाच अपेक्षा आहेत. करण जोहर सहनिर्मित आणि नित्या मेहरा दिग्दर्शित या चित्रपटात ...

‘बार बार देखो’ या चित्रपटाकडून करण जोहरला बºयाच अपेक्षा आहेत. करण जोहर सहनिर्मित आणि नित्या मेहरा दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ ही जोडी लीड रोलमध्ये आहे.‘बार बार देखो’ सध्या चर्चेत आहे ते त्यातील ‘काला चश्मा’ या गाण्यामुळे. चित्रपट निर्मात्यांनी १९९० दशकात गाजलेल्या ‘तेनू काला चश्मा जंतवा वे’चे कॉपीराईट्स विकत घेतले आहेत. हेच गाणे ‘बार बार देखो’ मध्ये नव्या रूपात सादर करण्यात येणार आहे. येत्या २७ जुलैला हे संपूर्ण गाणे रिलीज होणार आहे. तूर्तास या गाण्याचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. याच प्रमोशनसाठी ‘बार बार देखो’ गँगने काळा चश्मा घालून अशी मस्त पोझ दिली. सिद्धार्थने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फरहान अख्तर, रितेश सिधवानी, नित्या, सिद्धार्थ, कॅटरिना आणि करणचा हा  फोटो पाहायला हवाच..