Join us
Daily Top 2Weekly Top 5

​काजोलची बहीण तनीषा मुखर्जीचे बोल्ड फोटोशूट! पण लोकांनी म्हटले ‘टीबी पेशंट’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 14:48 IST

सोशल मीडियावर ट्रोल होणे सेलिब्रिटींसाठी नवे नाही. यावेळी ट्रोल झालीयं ती काजोलची बहीण व अभिनेत्री तनीषा मुखर्जी. तनीषाकडे सध्या ...

सोशल मीडियावर ट्रोल होणे सेलिब्रिटींसाठी नवे नाही. यावेळी ट्रोल झालीयं ती काजोलची बहीण व अभिनेत्री तनीषा मुखर्जी. तनीषाकडे सध्या काहीही काम नाहीयं, हे सगळ्यांनाचं ठाऊक आहे. काम मिळवण्यासाठी बॉलिवूडमध्ये काही गोष्टी कराव्या लागतात. यापैकीचं एक म्हणजे फोटोशूट. होय, तनीषाने असेच एक फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये तनीषा  बरीच स्लिम दिसतेय. शिवाय तितकीच ग्लॅमरसही. हे फोटो चाहत्यांना आवडतील, असा तनीषाचा अंदाज असावा. पण तिचा हा अंदाज साफ फसला.होय, कारण लोकांना तिचा हा अंदाज जराही भावला नाही आणि त्यामुळेच तिला ट्रोल व्हावे लागले. काही लोकांनी तनीषाचे हे ताजे फोटो पाहून तिला खूप जास्त ‘स्किनी’ ठरवले. ‘प्लीज, फिट राहा पण इतकेही स्लीम होऊ नकोस,’ असा सल्ला एका युजरने तिला दिला. काहींनी मात्र यापलीकडे जात तनीषाच्या या फोटोंवर भलत्याच प्रतिक्रिया लिहिल्या.एका युजरने तिला ‘हाडांचा सापळा’ म्हटले तर एकाने ‘टीबी पेशंट’. खरे तर तनीषाच्या ज्या लूकला ट्रोल केले जातेयं, ते मिळवण्यासाठी तनीषाने किती घाम गाळला असेल, याचा हिशेब नाही. जिममध्ये तासन् तास मेहनत शिवाय कडक डाएट केल्यानंतर कुठे तिला हा लूक मिळाला. पण इतके करूनही शेवटी लोकांना आवडले नाही म्हटल्यावर निराशा होणे साहजिकचं म्हणायला हवी. तनीषाच्या मनाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नसावी.‘बिग बॉस’च्या ७ व्या सीझनमध्ये तनीषा दिसली होती. यादरम्यान मी अभिनेता अरमान कोहलीच्या जवळ आली होती. पण ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच, दोघेही आपसी सहमतीने वेगळे झाले होते. तनीषाने अनेक चित्रपटांत काम केले आहे. तुम मिलो तो सही, अंतर, पॉपकॉन खाओ, टू वन थ्री, बी केअरफुल अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.  हिंदीशिवाय मराठी, तामिळ व तेलगू चित्रपटांतही ती दिसली. अर्थात बहिण काजोलसारखे यश तिला मिळवता आले नाही.