Join us

काजोलची लेक झाली २१ वर्षांची, अभिनेत्रीने निसासाठी शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 18:27 IST

Kajol And Nyasa Devgan : काजोल आणि अजय देवगणची मुलगी नीसा देवगण २० एप्रिलला तिचा २१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी काजोलने नीसाचा जुना फोटो शेअर केला आणि एक मोठा मेसेज लिहिला आहे. या पोस्टमध्ये काजोलने आई म्हणून तिच्या प्रवासाबद्दलही सांगितले आहे.

काजोल (Kajol) आणि अजय देवगण(Ajay Devgan)ची मुलगी नीसा देवगण (Nysa Devgan) २० एप्रिलला तिचा २१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी काजोलने नीसाचा जुना फोटो शेअर केला आणि एक मोठा मेसेज लिहिला आहे. या पोस्टमध्ये काजोलने आई म्हणून तिच्या प्रवासाबद्दलही सांगितले आहे. 

काजोलने लिहिले की, नीसा उद्या (२० एप्रिल) 21 वर्षांची होणार आहे पण आजचा हा दिवस माझ्याबद्दल आहे आणि मी आई कशी बनले. कशी तिने माझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण केली. तिने माझा प्रत्येक दिवस आनंदाने भरला आहे. ती मला कशी हसवायची आणि माझी मुलगी पूर्ण दिवस काय करते, हे जाणून घ्यायला चांगलं वाटतं. काय बोलतेय. जेव्हा पहिल्यांदा तिने मला आई म्हटलं तेव्हा कसे वाटले. कधी कधी वाटते की तिला पॅक करून एक दिवस पुन्हा पोटात ठेवू. प्रेम समजवण्यासाठी, मला तुझ्याबद्दल काय वाटते हे खूप छोटे शब्द आहे.

नीसा आई काजोलसारखी नाहीकाजोलने एकदा सांगितले होते की नीसा तिच्यासारखी नाही. काजोलने २०२३ मध्ये इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, माझी आई नेहमी म्हणायची की, देव करो तुझी मुलगी तुझ्यासारखी होऊ नये. मी हे नीसाला सांगितले आणि तेव्हा तिची प्रतिक्रिया होती की, नाही. मला भविष्यात मुलगा हवा आहे, कारण मला वाटत नाही की मी मुलगी सांभाळू शकेन.

वर्कफ्रंट...

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर काजोल शेवटची 'दो पत्ती'मध्ये दिसली होती. या चित्रपटातून क्रिती सनॉनने निर्माती म्हणून तिची इनिंग सुरू केली होती. याशिवाय ती द ट्रायल आणि लस्ट स्टोरीजमध्ये दिसली होती.

टॅग्स :काजोल