Join us

काजोल तिच्या चाहत्यांना देणार बर्थडेचे 'हे' अनोखं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 14:54 IST

काजोलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा आगामी सिनेमा 'हेलिकॉप्टर ईला'चा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. प्रदीप सरकार दिग्दर्शित सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता रिद्धी सेनची प्रमुख भूमिका आहे.

ठळक मुद्दे तब्बल आठ वर्षांनंतर काजोल सिंगल मदर बनणार आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

काजोलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा आगामी सिनेमा 'हेलिकॉप्टर ईला'चा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. प्रदीप सरकार दिग्दर्शित सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता रिद्धी सेनची प्रमुख भूमिका आहे. यात काजोल एका सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे जिची गायिका होण्याची इच्छा असते. आई- मुलाच्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. यात काजोल, रिद्धिसोबत नेहा धूपियाचीही महत्त्वाची भूमिका आहे.    'हेलिकॉप्टर ईला' हा सिनेमा एका गुजराती नाटकावर आधरित आहे. दिग्दर्शक प्रदीप सरकार या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले होते की, या सिनेमाची स्क्रिप्ट माझ्याकडे जवळपास दोन महिन्याआधी आली होती. हा सिनेमा गुजराती नाटकावर आधारित असल्यामुळे मला त्यांचे इमोशन्स पकडायला वेळ लागले. काही महिन्यांपूर्वी ती व्हीआयपी2’मध्ये धनुष सोबत दिसली होती.  बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप झाला होता. या चित्रपटात धनुष केवळ अभिनयच नाही, तर या चित्रपटाला प्रोड्यूसही केला होता  एवढेच नव्हे तर धनुषने या चित्रपटाचे डायलॉग आणि कथाही लिहिली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून काजोल दुसऱ्यांदा साउथ चित्रपटात काम केले होते. 'हेलिकॉप्टर ईला' सिनेमाची निर्मिती अजय देवगण आणि जयंतीलाल गाडा मिळून करतायेत. सात सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. तब्बल आठ वर्षांनंतर काजोल सिंगल मदर बनणार असल्याने तिच्या चाहत्यांना या सिनेमाची प्रतीक्षा प्रतीक्षा असणार.  काजोलने यापूर्वी २०१० साली ‘वी आर फॅमिली’ या चित्रपटामध्ये सिंगल मदरची भूमिका साकारली होती.  

टॅग्स :काजोलअजय देवगण