Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजय देवगण नाही तर बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यासोबत काजोलला करायचा आहे रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 21:14 IST

काजोल सध्या तिचा आगामी सिनेमा 'हेलीकॉप्टर ईला' च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे

ठळक मुद्दे'हेलीकॉप्टर ईला'  काजोल एका सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे आई- मुलाच्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे

काजोल सध्या तिचा आगामी सिनेमा 'हेलीकॉप्टर ईला' च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या काजोल व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोसन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तिला विचारले कि, आजच्या पिढीतील तरुण अभिनेत्यांपैकी कोणाबरोबर तुला सिनेमा काम करायला आवडेल? त्यावर तिने इंटरेस्टिंग उत्तर दिले.

डीएनए बरोबर बोलताना काजोल म्हणाली की "मला आजच्या अभिनेत्यांबरोबर काम करायला आवडेल पण स्क्रिप्ट सुद्धा चांगली असायला हवी" तरुण अभिनेत्याच्या नाव विचारले असता काजोल म्हणाली मला वरूण धवन बरोबर काम करायला आवडेल, मला वरूण आवडतो त्याच्या बरोबर काम करायला मजा येईल.

याआधी काजोलने शाहरुख बरोबर दिलवाले सिनेमा  केला होता. या सिनेमात वरुणदेखील होता. त्यानंतर वरूण धवन काजोलचा आवडता झाला.

 'हेलीकॉप्टर ईला'  काजोल एका सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे जिची गायिका होण्याची इच्छा असते. आई- मुलाच्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. 'हेलीकॉप्टर ईला' ही एक मॉर्डन आई आणि तिच्या एकुलत्या एक मुलाची हटके कहाणी आहे, जी आपल्या प्रत्येकाच्य आयुष्याच्या फार जवळची वाटते. जबाबदार आईबरोबरच एका महत्वाकांक्षी गायिकेच्या रुपात काजोलला या सिनेमात पाहता येणार आहे. या गंभीर आणि नाजूक विषयाला अत्यंत मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडला आहे. यात काजोल, रिद्धिसोबत नेहा धूपियाचीही महत्त्वाची भूमिका आहे. 'हेलिकॉप्टर ईला' हा सिनेमा एका गुजराती नाटकावर आधरित आहे. मितेश शाह द्वारा लिखित अजय देवगण आणि पेन इंडियाद्वारा या सिनेमाची निर्मीती करता येणार आहे. 

 

टॅग्स :काजोलवरूण धवन