Join us

ईद आणि गणेशोत्सवाच्या एकत्र शुभेच्छा देणाऱ्या काजोलला दिली धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 20:07 IST

सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम असून, प्रत्येकजण ज्याच्या-त्याच्या पद्धतीने हा उत्सव साजरा करीत आहे. संपूर्ण देशच या उत्सवात रममाण झाला ...

सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम असून, प्रत्येकजण ज्याच्या-त्याच्या पद्धतीने हा उत्सव साजरा करीत आहे. संपूर्ण देशच या उत्सवात रममाण झाला आहे. विशेष म्हणजे या उत्सवादरम्यानच बकरी ईद आल्याने, देशात सर्वत्र उत्सवाचे वातावरणच निर्माण झाले आहे. गणेशोत्सव आणि बकरी ईदचा उत्साह आणखी द्विगुणित व्हावा म्हणून अभिनेत्री काजोल हिने बकरी ईद आणि गणेशोत्सवाच्या एकत्र शुभेच्छा दिल्या. परंतु या शुभेच्छा काही लोकांच्या पचनी पडल्या नाहीत. त्यांनी केवळ काजोलच्या शुभेच्छांवर उलट-सुलट प्रतिक्रियाच दिल्या नाहीत, तर तिला चक्क धमकीही दिली. त्याचे झाले असे की, काजोलने सोशल मीडियाच्या माध्यमांतून एक ट्विट करीत चाहत्यांना गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. काजोलने ट्विटमध्ये लिहिले की, ‘जर आपला देव गणेशोत्सव आणि ईद एकत्र सेलिब्रेट करीत असतील तर मग आपण का नाही?’ काजोलच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. अनेकांनी तिला धमक्या दिल्या. अली इमराना नावाच्या यूजर्सने लिहिले की, ‘तू आमच्या अल्लाहची स्वत:च्या देवाबरोबर तुलना करू नकोस’ इमरानाच्या या उत्तराला अनेकांनी समर्थन देत काजोलच्या ट्विटवर उलट-सुलट कॉमेण्ट लिहिल्या. यामधून तिच्यावर संतापही व्यक्त केला. तर काहींनी मात्र काजोलची बाजू घेतली, एका यूजर्सने लिहिले की, ‘तू जे म्हणत आहेस ते अगदी बरोबर आहे. यामुळे जगात एकमेकांप्रती असलेला द्वेष संपून जाईल.’ काजोलच्या या ट्विटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच काजोल शाहरूख खानची पत्नी गौरी खान हिच्याबरोबर सेल्फी घेताना बघावयास मिळाली होती. काजोल गौरीच्या जुहू येथे असलेल्या स्टोअरमध्ये पोहोचली होती. दरम्यान, काजोलच्या या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काजोल यासर्व प्रकरणाचा कसा सामना करणार? यास कसे प्रत्युत्तर देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.