बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अजय देवगण याने नुकताच आपला ५७ वा वाढदिवस साजरा केला. या खास निमित्ताने जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिने मात्र एका हटके आणि मजेशीर पद्धतीने त्याला शुभेच्छा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काजोलने अप्रत्यक्षपणे अजयच्या वयाचा उल्लेख करत त्याची खिल्ली उडवली आहे. काजोलच्या पोस्टमध्ये नेमकं काय?
काजोलची मजेशीर पोस्टकाजोलने २ एप्रिलला इन्स्टाग्राम अकाऊंटवर अजय देवगणचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अजयच्या वयाची काजोलने खास शैलीत खिल्ली उडवली. काजोल लिहिते, ''कधी कधी आपण केकवर जी मेणबत्ती लावतो ती सेलिब्रेशनसारखी कमी भासते. उलट त्या मेणबत्तीपासून आग लागण्याचा धोका आहे, असं वाटत राहतं. मला असं वाटतंय तू सुद्धा त्याच टप्प्यावर पोहोचला आहेस. तरीही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला कायम केक मिळत राहो.''
अजय देवगण सहसा आपले वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे करण्याऐवजी कुटुंबासोबत शांतपणे घालवणे पसंत करतो. यावर्षीही त्याने आपला वाढदिवस घरच्या घरीच साजरा केल्याची चर्चा आहे. अजय सध्या त्याच्या आगामी 'दृश्यम ३' आणि 'गोलमाल ५' सारख्या मोठ्या चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे.
Web Summary : Kajol playfully teased Ajay Devgn on his 57th birthday with a humorous Instagram post about cake candles and aging. Fans loved her witty message and the couple's affectionate banter. Ajay celebrated quietly, focusing on upcoming films like 'Drishyam 3'.
Web Summary : काजोल ने अजय देवगन को उनके 57वें जन्मदिन पर केक की मोमबत्तियों और उम्र बढ़ने के बारे में एक मजेदार इंस्टाग्राम पोस्ट के साथ छेड़ा। प्रशंसकों को उनका मजाकिया संदेश और युगल की स्नेही हंसी-मजाक पसंद आई। अजय ने चुपचाप जश्न मनाया, और 'दृश्यम 3' जैसी आगामी फिल्मों पर ध्यान केंद्रित किया।