Join us
Daily Top 2Weekly Top 5

गाडीत बसून काजोलचं लोकरीने विणकाम, शेअर केला व्हिडिओ; मराठी अभिनेत्री कमेंट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 17:50 IST

काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती गाडीत बसून लोकरीचं विणकाम करताना दिसत आहे.

दमदार अभिनयाने ९०चं दशक गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे काजोल. 'कुछ कुछ होता है', 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे', 'कभी खुशी कभी गम', 'बाजीगर' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून काजोलने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही काजोलची लोकप्रियता कमी झालेली नाही. काजोल सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतंच तिच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती गाडीत बसून लोकरीचं विणकाम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने "विणकाम आणि बॅकसीट ड्रायव्हिंग एकाच वेळी", असं म्हटलं आहे. काजोलचा विणकाम करतानाचा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. काजोलने या आधीही विणकाम करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. 

काजोलचा हा विणकाम करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषने कमेंट केली आहे. अमृताने काजोलच्या व्हिडिओवर कमेंट करत "वॉव" असं म्हटलं आहे.

 दरम्यान, काजोल 'दो पत्ती' या सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. काजोलबरोबर 'दो पत्ती'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनही मुख्य भूमिकेत असणार आहे. 

टॅग्स :काजोलसेलिब्रिटीमराठी अभिनेता