Join us

काजोल म्हणतेय,‘ मी समाधानी ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 12:06 IST

 काजोल देवगण म्हणजे नव्वदच्या दशकातील रोमँटिक अभिनेत्रींपैकी एक होती. शाहरूख खान आणि काजोल यांची जोडी म्हणजे रोमँटिक कपलच. दिलवाले ...

 काजोल देवगण म्हणजे नव्वदच्या दशकातील रोमँटिक अभिनेत्रींपैकी एक होती. शाहरूख खान आणि काजोल यांची जोडी म्हणजे रोमँटिक कपलच. दिलवाले पासून त्यांच्या जोडीला प्रचंड चाहते निर्माण झाले.ती एका मुलाखतीदरम्यान म्हणते आहे की,‘ आत्तापर्यंत जे काम केले आहे त्यामुळे मी खुप खुश आहे. त्यापेक्षाही जास्त मी समाधानी आहे. व्यक्तीच्या आयुष्यात समाधान हे खुप महत्त्वाचे असते. आपल्या कामाविषयीचे समाधान प्रत्येकाला असते. पण, ते आपण किती सकारात्मक पद्धतीने घेतो ते देखील तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ स्क्रिनवर आपण कसे आहोत हे महत्त्वाचे नसते तर वैयक्तिक आयुष्यातही आपण कशाप्रकारे गोष्टींकडे पाहतो हे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला मी काही गमावलेय किंवा कुठलीही तक्रार माझी नाही.’