Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्या क्षणापासून काजोल सासूबाईच्या प्रेमात पडली, ‘आंटीजी’ची ‘मम्मीजी’झाली...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 08:00 IST

कहानी घर घर की ..., पण Kajol च्या घरातली थोडी वेगळी

आजही लाखो चाहते काजोलच्या (Kajol ) प्रेमात आहेत. तिच्या अ‍ॅक्टिंगच्या, तिच्या सिनेमाच्या प्रेमात आहेत. साहजिकच काजोलच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला कोणाला आवडणार नाही.   पर्सनल लाईफमध्ये अनेकांना काजोल थोडी उर्मट वाटते. काजोलही हे मान्य करते. स्वत:ला उर्मट नाही पण परखड आणि बºयापैकी मूडी म्हणवते. याच स्वभावामुळे लग्न झाल्या झाल्या सासूबाईसोबतही तिचे खटक उडायचे. खुद्द काजोलने एकदा ही कबुली दिली होती. पण कालांतराने याच सासूबाईच्या काजोल अक्षरश: प्रेमात पडली. होय, एक किस्सा असा काही घडला की काजोल सासूबाईच्या प्रेमात पडली. खुद्द काजोलने हा किस्सा सांगितला आहे.ट्विंकल  खन्नाच्या ‘Tweak India’ या युट्यूब चॅनलसाठी नुकतीच काजोलनं एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं तिच्या सासूबाईबद्दल खुलासा केला.

तिने सांगितले, ‘ लग्नाआधी मी अजयच्या आईला आंटीजी म्हणायचे. लग्न झालं आणि मी त्यांना तशीच आंटीजी हाक मारायचे. का कुणास ठाऊक पण माँ, मम्मीजी म्हणायला माझं मन तयार नव्हतं. एकदा माझ्यासासूबाईंच्या काही मैत्रिणी घरी जमल्या होत्या. याचदरम्यान मी सासूबाईंना आंटीजी अशी हाक मारली आणि त्यांच्या मैत्रिणी माझ्याकडे आश्चर्यानं पाहू लागल्या. हे काय? तुझी सून अजूनही तुला मम्मीजी, माँ म्हणत नाही? ’असं त्या माझ्या सासूबाईंना म्हणाल्या. यावर माझ्या सासूबाईंनी लगेच उत्तर दिलं. जेव्हा ती मला मम्मीजी, माँ म्हणून हाक मारेल, ते मनापासून असेल. म्हणायचं म्हणून ती मला मम्मीजी म्हणणार नाही आणि मी त्या क्षणाची प्रतीक्षा करेल... माझ्या सासूबाईंचं ते वाक्य मी ऐकलं आणि मी त्यांच्या अक्षरश: प्रेमात पडलं. त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर, प्रेम अधिक वाढला आणि त्यानंतर मी त्यांना मम्मीजी अशी हाक मारू लागले. माझ्या सासूबाईंनी माझ्यावर काहीही लादलं नाही. त्यांनी मला माझी स्पेस दिली. मी जशी आहे तसं स्वीकारलं, असंही काजोल म्हणाली.   अजय देवगण आणि काजोलने 24 फेब्रुवारी 1999 रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांना न्यासा नावाची मुलगी आणि युग नावाचा मुलगा आहे.

टॅग्स :काजोल