Join us

​‘शिवाय’ नाही तर ‘या’ चित्रपटाला प्रमोट करतेय काजोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 17:00 IST

काजोलचा लाडका हबी अजय देवगण याचा मेगाबजेट ‘शिवाय’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा येत्या दिवाळीत रिलीज होतो आहे. पण काजोल मात्र सध्या दुसराच चित्रपट प्रमोट करतेय.

काजोलचा लाडका हबी अजय देवगण याचा मेगाबजेट ‘शिवाय’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा येत्या दिवाळीत रिलीज होतो आहे. ‘शिवाय’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. अशास्थितीत काजोलने ‘शिवाय’ प्रमोट करणे अपेक्षित आहे. पण काजोल मात्र सध्या दुसराच चित्रपट प्रमोट करतेय. होय, काजोल सध्या ‘पार्च्ड’ या चित्रपट प्रमोट करण्यात बिझी आहे. आता असे का? तर ते तुम्हाला कळायलाच हवे. खरे सांगायचे तर,‘पार्च्ड’ हा सुद्धा अजय देवगणच्या होम प्रॉडक्शनचा चित्रपट आहे. लीना यादव दिग्दर्शित हा चित्रपट संपूर्णत: महिलाप्रधान आहे. काजोलने लीना आणि ‘पार्च्ड’च्या स्टारकास्टसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘The Parched promotions on full swing,’असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. इन्स्टाग्रामवरही काजोजने लीनासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.