Join us

​काजोल-करणमध्ये बिनसले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:06 IST

करण-काजोलमध्ये बिनसले असल्याचे बोलले जात आहे. काजोलचा पती अभिनेता अजय देवगन यांने ‘दोघांत आता पूर्वीसारखी मैत्री राहिली नाही’, असे सांगितले आहे.

दिग्दर्शक करण जोहर व अभिनेत्री काजोल यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. या दोघांत चांगली मैत्री असल्याचे सांगण्यात येते. मात्र आता करण-काजोलमध्ये बिनसले असल्याचे बोलले जात आहे. काजोलचा पती अभिनेता अजय देवगन यांने ‘दोघांत आता पूर्वीसारखी मैत्री राहिली नाही’, असे सांगितले आहे. ‘काजोल ही माझ्यासाठी लकी आहे’ अशी कबुली करणने अनेकदा दिली आहे. करणच्या पहिल्या चित्रपटात काजोलने प्रमुख भूमिका साकारली होती. अजय देवगनशी लग्न झाल्यावरही दोघांनी एकत्र काम केले. काजोलचा नवरा असतानादेखील अजय-करण यांची मैत्री झाली नाही. यातच अजय देवगनचा ‘शिवाय’ व करण जोहरचा ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांच्या रिलीजवरून वाद सुरू आहे. अजय देवगन म्हणतो, ‘‘मी आणि करण मित्र नव्हतोच. आता तर काजोल व करणच्या मित्रत्वाचे नाते पूर्वीसारखे राहीले नाही. यात व्यावसायिक कारण नसून त्यात काही खाजगी कारणे असू शकतात. मात्र हे त्रासदायक आहे.’’ यामागील कारणाविषयी विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘मला यावर काहीच बोलायचे नाही’’.काजोलने करण जोहरच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. यात ‘कुछ कुछ होता’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ यात काजोलच्या प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर स्टुडंट आॅफ द ईअर मध्ये तिचा स्पेशल अपिरअरंस होता. अजय देवगन सध्या होम प्रोडक्शनच्या शिवाय या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या काही जबाबदाºया काजोल सांभाळत आहे. अजय देवगनचा ‘शिवाय’ व करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हे चित्रपट 28 आॅक्टोंबरला प्रदर्शित होत आहेत.