Join us

​खुद्द लेकीकडून ‘ट्रोल’ झाली काजोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 12:05 IST

सोशल मीडियावर कोण, कधी आणि कसे ‘थट्टेचा विषय’ बनेल, हे सांगता येत नाही. सेलिब्रिटींसाठी तर हे अजिबात नवीन नाही. ...

सोशल मीडियावर कोण, कधी आणि कसे ‘थट्टेचा विषय’ बनेल, हे सांगता येत नाही. सेलिब्रिटींसाठी तर हे अजिबात नवीन नाही. जरा कुठे शब्द इतके तिकडे झाले रे झालेत की, सेलिब्रेटींवर ‘ट्रोलिंग’चा मारा सुरु होतो. म्हणजेच त्यांची टर उडवणाºया, त्यांच्या बोलण्यावर संताप व्यक्त करणाºया प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात होते. आता सोशल मीडियावर कॉमन नेटिजन्सकडून ‘ट्रोल’ होणे आपण समजू शकतो. पण आपल्या स्वत:च्याच मुलीकडून ‘ट्रोल’ होणे, म्हणजे जरा अतिच झाले. पण अभिनेत्री काजोलबाबतीत हे घडले. काजोल तिची मुलगी न्यासा हिच्याकडून ‘ट्रोल’ झाली.त्याचे झाले असे की, काजोलने तिचे तीन वेगवेगळ्या एक्सप्रेशनचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. ‘जेव्हा केव्हा मी माझ्या मुलांना एकत्र बघते,’ असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले. शिवाय या फोटोसोबत न्यासाला टॅगही केले. पण कदाचित आईने असे फोटो शेअर करणे,न्यासाला फारसे आवडले नाही. हे फोटो पाहून तिला कदाचित लाजीरवाणे वाटले. मग काय, तिने आईच्या या फोटोंवर अशी काही कमेंट केली की, सगळेच अवाक झालेत. ‘मॉम, तू इतके एक्स्ट्रा का करतेस?’ अशी कमेंट न्यासाने केली. खरे तर न्यासाच्याच आग्रहावरून काजोलने इन्स्टाग्राम अकाऊंट उघडले होते.अजय देवगण व काजोल यांना दोन मुले आहे. बेटा युग आणि मुलगी न्यासा. २००३ मध्ये जन्मलेली न्यासा आता १३ वर्षांची आहे. न्यासाला वाचनाची प्रचंड आवड आहे. वडील अजय देवगणसोबत न्यासा बरेचदा सार्वजनिक ठिकाणी दिसली. गतवर्षी ‘शिवाय’च्या रिलीजवेळी अजयने न्यासा त्याच्यावर बरीच नाराज असल्याचे सांगितले होते. गेल्या दिड वर्षांपासून मी प्रचंड बिझी होतो. त्यामुळे न्यासा माझ्यावर जाम चिडली होती. नाराज होती, असे अजयने सांगितले होते. अर्थात पप्पांच्या ‘शिवाय’ची एक झलक पाहिल्याबरोबर न्यासाचा राग कुठल्या कुठे पळून गेला होता.also read : ​करण म्हणतो, माझ्या व काजोलच्या नात्यात आता काहीही उरलेले नाही​काजोल नच बलियेमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत