काजोलला वाटतो आपल्या मुलीचा अभिमान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 18:15 IST
अभिनेत्री काजोलला आपली मुलगी न्यासाचा खूप अभिमान वाटतो. काही दिवसांपूर्वी न्यासाने इन्स्टाग्रामवर आपल्या आईची गंमत केली होती. त्यावर आपल्या मुलीचा ‘सेन्स आॅफ ह्यूमर’ खूपच छान आहे, असे काजोल म्हणते.
काजोलला वाटतो आपल्या मुलीचा अभिमान!
अभिनेत्री काजोलला आपली मुलगी न्यासाचा खूप अभिमान वाटतो. काही दिवसांपूर्वी न्यासाने इन्स्टाग्रामवर आपल्या आईची गंमत केली होती. त्यावर आपल्या मुलीचा ‘सेन्स आॅफ ह्यूमर’ खूपच छान आहे, असे काजोल म्हणते. आपल्या मुलीचे कौतुक करताना काजोल म्हणाली, ‘ज्यावेळी माझी मुलगी दोन वर्षांची होती, त्यावेळेपासूनच मला वेगळेपण जाणवू लागले आहे. पहिली ते दहावी ही वर्षे अगदी काही क्षणातच निघून गेल्याचे वाटते आहे. तिने मला बरेच काही शिकविले आहे. काजोलपेक्षा एक व्यक्ती नक्कीच चांगली आहे, ती म्हणजे मुलगी न्यासा. तिचा सेन्स आॅफ ह्युमर कमालीचा आहे. मला त्याचे कौतुक आहे. ती खूप खूप छान आहे. काही वेळा ती कटू भासते परंतू ती खूप गंमतीशीर आहे.इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी न्यासाने काजोलच्या पोस्टवर ट्रोल करताना काही मेसेज टाकले होते.