Join us

'या' दिवशी सुरू होणार काजोल-ट्विंकल खन्नाचा नवीन टॉक शो, कुठे पाहाल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:17 IST

काजोल आणि ट्विंकल खन्नाचा नवा टॉक शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Kajol-Twinkle Khanna Talk Show: बॉलिवूडमध्ये सध्या टॉक शो आणि पॉडकास्टचा ट्रेंड वाढतोय. नेटफ्लिक्सवर अभिनेता कपिल शर्माचा 'द ग्रेट कपिल शर्मा शो' जोरदार सुरू आहे. आता नेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओ एक नवीन धमाल टॉक शो घेऊन येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्ना हा शो सादर करणार आहेत. 'टू मच विद काजोल अँड ट्विंकल' असं या टॉक शोचं नाव आहे.  

'टू मच विद काजोल अँड ट्विंकल' हा शो येत्या २५ सप्टेंबरपासून अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. अमेझॉन प्राइमने सोशल मीडियावर एक मजेदार पोस्टर शेअर करून याची घोषणा केली आहे. होस्ट म्हणून काजोल आणि ट्विंकल खन्ना सेलिब्रिटींसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतील. 

या शोमध्ये कोणते सेलिब्रिटी पाहुणे म्हणून येणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. वृत्तांनुसार, अनेक मोठी नावे या शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे. यात विशेषतः सलमान खान आणि आमिर खान यांचा समावेश आहे. हे दोन्ही दिग्गज कलाकार या शोमध्ये एकत्र दिसू शकतात, असेही म्हटले जाते. सलमान आणि आमिरने या भागाचे शूटिंग पूर्ण केल्याचेही वृत्त आहे. त्यांच्या व्यतिरिक्त शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांसारख्या मोठ्या नावांचाही पाहुण्यांच्या यादीत समावेश आहे.

काजोल शेवटची 'माँ' या चित्रपटात दिसली होती, जो २७ जून रोजी प्रदर्शित झाला होता. तर ट्विंकल खन्नाही तब्बल २४ वर्षांनंतर मनोरंजन विश्वात कमबॅक करत आहे. ट्विंकल खन्नाचं या शोद्वारे कसं कमबॅक होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :काजोलट्विंकल खन्ना