बॉलिवूड अभिनेत्री रेखा नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत येत असतात. मग त्यांचे अमिताभ बच्चन यांच्यासोबत नाव जोडल्यामुळे झालेल्या वादामुळे असेल किंवा इव्हेंटमधील त्यांच्या सौंदर्यांमुळे. लाइमलाइटमध्ये बऱ्याचदा त्या येत असतात. असेच काहीसे १९९६ साली पहायला मिळाले, जेव्हा अभिनेत्रीने एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी त्यांनी आणि काजोलसोबत एकाच स्वेटरमध्ये पोझ दिल्या होत्या. हे फोटोशूट इतके बोल्ड होते की ते त्यांच्या चाहत्यांना अजिबात आवडले नव्हते आणि पाहता पाहता त्याच्यावरून कॉन्ट्रव्हर्सी झाली होती.
रेखा आणि काजोल या दोघी वेगवेगळ्या पिढ्यांमधील अभिनेत्री आहेत. त्या दोघींचे असे एकत्र येणे सर्वांसाठी हैराण करणारे होते. मात्र त्या दोघींचे एकाच स्वेटरच्या आतमधील फोटो पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
या दोघी सिनेब्लिट्ज पत्रिकाच्या कव्हरपेजवर झळकल्या होत्या. त्या दोघींनी अंतरंगी पोझ दिल्या होत्या. या फोटोशूटनंतर या दोघींवर खूप टीका झाली. त्या दोघींच्या फोटोशूटची चर्चा खूप काळी रंगली होती.
काजोलने १९९२ साली बॉलिवूडमधील कारकीर्दीला सुरूवात केली होती आणि १९९६ साली काजोल या फोटोशूटमुळे चर्चेत आली. आजही त्यांचे हे फोटोशूट लोकांच्या लक्षात आहे.
आता ती प्रभासचा चित्रपट आदिपुरूषमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप या वृत्ताला तिने दुजोरा दिलेला नाही.