कियारा अडवाणीचा ‘मशीन’ एक आठवडा आधी होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 21:26 IST
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व मुस्तफा अब्बास यांच्यान प्रमुख भूमिका असलेला ‘मशीन’ हा चित्रपट एक आठवडा आधी रिलीज करण्याचा ...
कियारा अडवाणीचा ‘मशीन’ एक आठवडा आधी होणार रिलीज
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व मुस्तफा अब्बास यांच्यान प्रमुख भूमिका असलेला ‘मशीन’ हा चित्रपट एक आठवडा आधी रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा चित्रपटातून प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास-मस्तान या जोडीतील अब्बास बर्मावाला यांचा मुलगा मुस्तफा बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. आपल्या मुलाच्या ग्रॅण्ड डेब्यूची तयारी करीत असतानाच निर्मात्यांनी एका निवेदनाद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली असल्याचे कळविले आहे. निर्माता व दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तान यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार ‘मशीन’ हा चित्रपट 24 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता, मात्र तो आता 17 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटातून दिग्दर्शक अब्बास बर्मावाला यांचा मुलगा मुस्तफा बॉलिवूड डेब्यू करणार असल्याने याची जोरदार तयारी करण्यात आली होती. या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना असे संकेत निर्मात्यांनी दिले होते. मात्र अचानक या चित्रपटाची तारीख बदलल्याने ही बाब अनेकांना आश्चर्यात टाकणारी ठरली आहे. दिग्दर्शक अब्बास मस्तान या जोडीने दिग्दर्शित आतापर्यंत बाजीगर, अजनबी, रेस आणि रेस 2 या सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केल आहे. आगामी मशीन हा चित्रपट देखील अॅक्शन थ्रिलर असून यात मुस्तफा व कियारा अडवाणी यांचा भरपूर रोमांस पहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘इतना तुम्हे’ हे गाणे प्रियांका चोप्राने रिलीज केले होते. हे गाणे पाहिल्यावर या दिग्दर्शकांनी शूटिंगसाठी चांगलीच मेहनत घेतली असल्याचे दिसते. कि याराने एम.एस. धोनी, फगली या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अब्बास मस्तान हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात अशा वेळी ‘मशीन’ त्याच्याच शैलीतील चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. २०१७ सालाच्या सुरुवातीपासूनच चित्रपट प्रदर्शनाच्या तारखांत अनेक बदल झाले असल्याचे दिसते. दीपिका पादुकोणचा ‘ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ झांडर केज’, कमांडो २, यासह अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट बदलविण्यात आल्या आहेत.