Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्स ऑफिसवर शाहिदच्या 'कबीर सिंग'ची जादू, ठरणार का 2019चा गेम चेंजर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 06:30 IST

शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी स्टारर 'कबीर सिंग' सिनेमाची जादू दुसऱ्या आठवड्यात ही कायम आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कोटींची उड्डाण घेताना दिसतोय

ठळक मुद्दे11 व्या दिवशी कबीर सिंगने 9 कोटींचा गल्ला जमावला आहे

शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी स्टारर 'कबीर सिंग' सिनेमाची जादू दुसऱ्या आठवड्यात ही कायम आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कोटींची उड्डाण घेताना दिसतोय. रिलीजनंतर 11 व्या दिवशी कबीर सिंगने 9 कोटींचा गल्ला जमावला आहे. सिनेमाने आतापर्यंत ऐकूण 190.64 कोटींची शानदार कमाई केली आहे. ट्रेंड एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार कबीर सिंग हा 2019 मधला सगळ्यात मोठा गेम चेंजर सिनेमा बनण्याच्या वाटेवर आहे.

 

दुसऱ्या आठवड्यात ही शनिवारी 17.10 कोटी, रविवारी 17.84 कोटी आणि सोमवारी 9.07 कोटींची कमाई केली आहे. सोमवार पर्यंत सिनेमाने 190.64 कोटींचा बिझनेस केला होता. त्यामुळे सिनेमा लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल यात काहीच शंका नाही.

कबीर सिंगला सामान्य प्रेक्षकांकडून मिळालेल्या रिव्ह्यूजमुळे मोठा फायदा झाला. माऊथ पब्लिसिटीमुळे या सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली. तरुणाईमध्ये या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे.

 

कबीर सिंग या चित्रपटात शाहिदने एका डॉक्टरची भूमिका साकारली आहे. या सिनेमावर मुंबईतील एका डॉक्टरनं तक्रार दाखल केली आहे. या सिनेमात डॉक्टरर्सची प्रतिमा बिघडवण्यात आल्याचे मुंबईतील एका डॉक्टरचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईतील डॉक्टरने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, राज्य आरोग्य मंत्रालय आणि सेन्सर बोर्ड ऑफ  फिल्म सर्टिफिकेशन यांना देखील पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रातून कबीर सिंग सिनेमाची स्क्रीनिंग थांबवण्याची मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :कबीर सिंगशाहिद कपूरकियारा अडवाणी