Join us

‘सुल्तान’ मध्ये कबीर खानची स्पेशल एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 10:49 IST

 सलमान खानचा ‘सुल्तान’ चित्रपट सर्वांनाच आवडतोय. समीक्षक आणि चाहते यांनीही चित्रपटाला प्रचंड डोक्यावर घेतले आहे. सलमानने आत्तापर्यंत कबीर खानच्या ...

 सलमान खानचा ‘सुल्तान’ चित्रपट सर्वांनाच आवडतोय. समीक्षक आणि चाहते यांनीही चित्रपटाला प्रचंड डोक्यावर घेतले आहे. सलमानने आत्तापर्यंत कबीर खानच्या दोन चित्रपटात काम केले आहे. ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ यात कबीर खान आणि सलमान खान यांची चांगलीच जोडी जमली होती.कबीरला एकदा सलमानच्या चित्रपटात थोड्या वेळासाठी तरी काम करायचे होते. आता हीच जोडी पुन्हा एकदा त्यांचा आगामी चित्रपट ‘ट्युबलाईट’ मध्ये दिसणार आहे.‘सुल्तान’ मध्ये एक सीन आहे ज्यात सुल्तान आॅलिम्पिक्स मध्ये गोल्ड मेडल जिंकून परततो, तेव्हा अनेक फॅन्स त्याचे आॅटोग्राफ घ्यायला येतात. तेव्हा टीव्हीवर हे दाखवत असताना तिथेच कबीरची एन्ट्री आहे. वेल, कबीरही सुल्तान मध्ये सलमान सोबत झळकला तर...!