Join us

कबीर बेदीने सनी लिओनीकडे मागितला पर्सनल नंबर, बेबी डॉलने दिले असे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 13:02 IST

एका इव्हेंट दरम्यान हा किस्सा घडला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि आयटम सनी लिओनी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.  सनीचे मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॅन फॉलोईंगदेखील आहे. सनी नुकतीच फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर लाँच इव्हेंटला स्पॉट झाली होती. याठिकाणी ज्येष्ठ अभिनेता कबीर बेदीसुद्घा उपस्थित होते. सनीकडे अभिनेता कबीर बेदीने चक्क तिचा पर्सनल फोन नंबर मागितला यावर सनीने स्वता:चा नंबर न देता पती डॅनिअला मोबाईल नंबर दिला. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर सनी काही महिन्यांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मोतीचूर चकनाचूर सिनेमातील गाणं 'बत्तियां बुझा दो' गाण्यात दिसली होती. पुन्हा एकदा सनी आपला हॉट अवतार दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.  

काही दिवसांपूर्वीच तिचा ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स २’ या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमध्ये सस्पेन्स, अ‍ॅक्शन, थ्रिलर सोबतच हॉरर आणि बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.यानंतर ती रंगीला (मल्याळम), मधुरा राजा (मल्याळम), वीरमादेवी (तमिळ), 'कोका कोला' (हिंदी/ तेलुगू). ऐकूणच सनी लिओनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करुन खूश असल्याचे तिने सांगितले होते.

   

टॅग्स :सनी लिओनीकबीर बेदी