बॉलिवूडमधून एक गुडन्यूज आली आहे. अथिया शेट्टी, क्रिती सेनॉन यांच्यानंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री आई झाली आहे. 'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्रीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अभिनेत्री मालविका राजला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज तिने चाहत्यांना दिली आहे.
मालविकाने काही महिन्यांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. शनिवारी(२३ ऑगस्ट) तिने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याने मालविका आणि कुटुंबीय आनंदी आहेत. मालविकाने मुलगी झाल्याची बातमी पोस्टद्वारे शेअर केली आहे. "आमच्या हृदयापासून ते आमच्या हातात येईपर्यंत...आमची गोंडस लेक", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी मालविकाचं अभिनंदन केलं आहे.
मालविकाने २०२३ मध्ये प्रियांक मित्तलसोबत विवाह केला होता. लग्नाच्या २ वर्षांनी ती आई झाली आहे. मालविका राजने 'कभी खुशी कभी ग़म' या चित्रपटात करीना कपूरच्या लहानपणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले होते. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केले. काही वेब शोमध्येही ती दिसली होती.