Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ कॅटची बहिण इसाबेल कैफने केले असे काम की श्रद्धा कपूरचा झाला तिळपापड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 14:02 IST

कॅटरिना कैफची लहान बहीण इसाबेल कैफ सध्या बॉलिवूडमध्ये यायचीय. पण बॉलिवूडमध्ये यायच्या आधीच इसाबेल चर्चेत आहे. होय, चर्चा खरी ...

कॅटरिना कैफची लहान बहीण इसाबेल कैफ सध्या बॉलिवूडमध्ये यायचीय. पण बॉलिवूडमध्ये यायच्या आधीच इसाबेल चर्चेत आहे. होय, चर्चा खरी मानाल तर इसाबेलने श्रद्धा कपूरचा संताप ओढवून घेतला आहे. आता  कुणी मागून येऊन आपल्या कामावर डल्ला मारत असेल तर अंगाचा तिळपापड तर होणारच. श्रद्धाचेही नेमके तेच झाले.  करिना कपूर व श्रद्धा कपूर दोघीही एक आयमेकअप ब्रॅण्ड प्रमोट करत होत्या. मात्र अचानक या ब्रॅण्डने म्हणे, श्रद्धाऐवजी इसाबेलला घ्यायचा निर्णय घेतला. श्रद्धा या ब्रॅण्डला २०१४ पासून प्रमोट करतेय. त्यामुळे अचानक श्रद्धाला डच्चू देण्याचा निर्णय धक्कादायक मानला जात आहे.  जिची बॉलिवूडमध्ये अधिकृत एन्ट्रीही नाही, अशी इसाबेल श्रद्धाच्या जागी दिसणार म्हटल्यावर तर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कानामागून आली अन् तिखट झाली, असेच काहीसे इसाबेलबद्दल म्हटले जात आहे.ALSO READ : ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये भाव खाऊन गेली कॅटरिनाची बहीण इसाबेल कैफ!!इसाबेल बॉलिवूड एन्ट्रीसाठी अगदी तयार आहे. तिला केवळ एका चांगल्या कथेची प्रतीक्षा आहे. सध्या कॅटरिना इसाबेलच्या करिअरसाठी दिवसरात्र खपते आहे. सलमानच्या मदतीने तिने तिला एका मोठ्या ब्रॅण्डची जाहिरात मिळवून दिली. पण आता इसाबेलला लॉन्च करायची कॅटची धडपड सुरु आहे. यासाठी अर्थात कॅटरिनाने पुन्हा एकदा सलमानला गळ घातल्याची चर्चा आहे.   अलीकडे इसाबेलला एका मोठ्या कॉस्मेटिक ब्रॅण्डची जाहिरात मिळाली. या जाहिरातीचे शूटींग नुकतेच पार पडले. यानंतर इसाबेल मीडियासमोर हा ब्रॅण्ड प्रमोट करतानाही दिसली. पण  ब्रण्ड प्रमोशनऐवजी याठिकाणी इसाबेलने दाखवलेल्या नखºयांचीच जास्त चर्चा झाली. या ब्रॅण्ड प्रमोशनदरम्यान इसोबेल इलेक्ट्रॉनिक मीडियाशी तर  बोलली पण प्रिंट मीडियाशी बोलण्यास तिने स्पष्ट नकार दिला. मला केवळ ब्रॅण्डशीसंबंधित प्रश्नचं विचारण्यात यावे. त्यापलीकडे मी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असा तोरा मिरवण्यापासून तर लाईट अरेंजमेंटवरून ड्रामा करण्यापर्यंत असे काय काय म्हणे इसाबेलने केले.