१६ वर्षांपूर्वी म्हणजे २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या गाण्याने एकच धूम केली होती. या गाण्याने शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली होती. यानंतर २००४ मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात ती बिजलीच्या भूमिका साकारताना दिसली. पुढे ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकली. पण यानंतर मनोरंजन विश्वातून अचानक गायब झाली.
हरमीत गुलजारसोबत तिचे पहिले लग्न झाले होते. अर्थात शेफालीचे दुसरे लग्नही टिकले नाहीत. २००९ मध्ये शेफालीचा घटस्फोट झाला. अलीकडे एका मुलाखतीत बोलताना, माझ्याशिवाय दुसरी कुणीच ‘कांटा लगा’ गर्ल होऊ शकत नाही, असे ती म्हणाली होती.‘कांटा लगा’शिवाय शेफालीने कभी आर कभी पार, माल भारी है आणि प्यार हमें किस मोड पे ले आया अशी अनेक गाणी केली आहेत.