Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्वाला गुट्टा या प्रसिद्ध अभिनेत्याला करतेय डेट, सोशल मीडियावरून स्वतःच केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 19:25 IST

ज्वाला एका अभिनेत्यासोबत नात्यात असून तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे.

ठळक मुद्देज्वाला तमीळ अभिनेता विष्णू विशालसोबत नात्यात असून नववर्षाच्या निमित्ताने त्यांनी आपले नाते सगळ्यांसमोर जाहीर करण्याचे ठरवले आहे.

ज्वाला गुट्टा तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकीच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान मोहोम्मद अझरुद्दीनसोबत तिचे नाव जोडण्यात आले होते आणि आता ती एका अभिनेत्यासोबत नात्यात असून तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे.

ज्वाला तमीळ अभिनेता विष्णू विशालसोबत नात्यात असून नववर्षाच्या निमित्ताने त्यांनी आपले नाते सगळ्यांसमोर जाहीर करण्याचे ठरवले आहे. तिने विष्णूसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून त्यांचे हे फोटो पाहून ज्वाला आणि विष्णूच्या फॅन्सने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

ज्वालाने ट्विटरवर विष्णूसोबतचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या दोन्ही फोटोत त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत असून त्यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. विष्णू आणि ज्वाला हे नात्यात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून मीडियात रंगली होती. पण त्या दोघांनी याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. 

 

विष्णू हा प्रसिद्ध तमीळ अभिनेता असून त्याने 2009 मध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तमीळ इंडस्ट्रीतील तो प्रसिद्ध अभिनेता असून त्याचे लग्न रजनी नटराजन सोबत 2011 मध्ये झाले होते. पण काहीच वर्षांत त्यांच्यात दुरावा निर्माण झाला तर ज्वालाचे लग्न बॅडमिंटनपट्टू चेतन आनंदसोबत झाले होते. त्यांनी काहीच वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. 

 

 

टॅग्स :बॉलिवूड