जस्टीन बीबर भारतात दाखल; मुंबई ‘जस्टीनमय’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 10:06 IST
देश-विदेशातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टीन बीबर मुंबईत दाखल झाला आहे. रात्री 1.30 च्या सुमारास तो ...
जस्टीन बीबर भारतात दाखल; मुंबई ‘जस्टीनमय’
देश-विदेशातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टीन बीबर मुंबईत दाखल झाला आहे. रात्री 1.30 च्या सुमारास तो चार्टर्ड प्लेनने कलिना येथील विमातळावर उतरला. त्याच्यासोबतचे जवळपास 120 क्रू मेंबर्स याआधीच मुंबईत पोहोचले आहेत. विमानतळावर बीबरची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते उपस्थित होते. विमानतळावरून तो थेट लोअर परेल येथील हॉटेलमध्ये गेला, त्याच्या सुरक्षेसाठी इतर सुरक्षांसोबतच सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा हा देखील त्याच्यासोबत आहे. आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये जस्टीन बीबरचा म्युझिकल कॉन्सर्ट होणार आहे. त्यासाठी देशभरातून बीबरचे चाहते नवी मुंबईत येणार आहेत. कार्यक्रमाचे तिकीट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असले, तरीदेखील उच्चभ्रू वसाहतींमधील तरुणाई मात्र,जस्टीन बीबरला लाइव्ह ऐकण्यासाठी हवी ती किंमत मोजण्यास तयार आहेत. या कार्यक्रमास सुमारे 35 ते 45 हजार प्रेक्षक अपेक्षित आहेत. पॉप गायक जस्टीनचा भारतातील लाइव्ह कार्यक्रम आणि त्याची झलक पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातील तरुणवर्ग या ठिकाणी जमणार आहे. याकरिता नवी मुंबई पोलिसांकडून विशेष फौजदेखील तयार करण्यात आली आहे. स्टेडियमच्या दिशेने जाणºया मार्गात बदल करण्यात आले असून कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कार्यक्रमस्थळी 500 हून अधिक पोलीस कर्मचारी तर 75 अधिकारी बंदोबस्तावर नेमण्यात आले आहेत. बुधवारी संध्याकाळी होणाºया या कार्यक्रमासाठी सकाळी 11 वाजल्यापासून चोख बंदोबस्त राहणार आहे. यादरम्यान स्टेडियमच्या प्रवेश मार्गावर केवळ तिकीट असलेल्या प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी प्रेक्षकांच्या वाहनांसाठी करावे येथील गणपतशेठ तांडेल मैदान, नेरुळचे रामलीला मैदान, पामबीचलगत बामनदेव मैदान तसेच तेरणा कॉलेजचे मैदान याठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणावरुन स्टेडियमपर्यंत जाण्यासाठी आयोजकांतर्फेशटल बस चालवली जाणार आहे. यादरम्यान वाहतुकीचा खोळंबा होवू नये याकरिता 200 वाहतूक पोलीस बंदोबस्तावर नेमल्याचे वाहतूक उपआयुक्त नितीन पवार यांनी सांगितले. त्याशिवाय आयोजकांचेही 100 स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत, तर स्टेडियमचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर देखील प्रेक्षकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशाला बंदी असणार आहे. जस्टीन किशोर वयापासूनच तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरला. भारतात आपल्या पहिल्या-वहिल्या कार्यक्रमासाठी आलेल्या बिबरने आयोजकांकडे लक्झरी डिमांडची यादी पाठविली आहे. ही यादी प्रत्येकाला अवाक करणारी असून, सध्या त्याने केल्या डिमांड चचेर्चा विषय ठरत आहे. व्हाइट फॉक्स इंडियाकडून जस्टीनच्या राजेशाही थाटाची मागणी पूर्ण करण्यात आली असून, त्याकरिता काही विचित्र मागण्याही पूर्ण करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम स्थळ ते हॉटेलच्या प्रवासाकरिता रोल्स रॉइस, त्याच्यासोबत 100 जणांची टीम असणार आहे. जस्टीन परफॉर्म करण्यासाठी हॉटेलपासून स्टेडियमपर्यंत रस्तेमार्गे नाही, तर चॉपर (हेलिकॉप्टर)ने जाणार असल्याने, याचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील दोन आलिशान हॉटेल्स्चे बुकिंग करण्यात आले आहे़ जस्टीनचा ताफा नेण्यासाठी 10 लक्झरी कार, 2 वॉल्वो बस तैनात केल्या जाणार आहेत. त्यांच्या कॉन्सर्टसाठी केलेल्या खर्चाने त्याला देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेने सर्वांचे लक्ष वेधले आहे़.