Join us

Just for Women !! ​OMG !! इतकी बदलली राजमाता शिवगामी देवी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 11:27 IST

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’ या चित्रपटांतील ‘बाहुबली’नंतर सर्वाधिक यादगार भूमिका कुठली असेल तर ती राजमाला शिवगामी देवीची. होय, अभिनेता प्रभासने ...

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’ या चित्रपटांतील ‘बाहुबली’नंतर सर्वाधिक यादगार भूमिका कुठली असेल तर ती राजमाला शिवगामी देवीची. होय, अभिनेता प्रभासने या चित्रपटात बाहुबली साकारला तर अभिनेत्री रम्या कृष्णन हिने राजमाता शिवगामी देवीचे पात्र जिवंत केले.  शिवगामी देवीच्या रूपात रम्याशिवाय इतर कुणाची कल्पनाही आता आपण करू शकणार नाहीत, इतका जीव तिने या भूमिकेत ओतला.  या भूमिकेने रम्याला बरीच लोकप्रियता दिली. पण आता कदाचित रम्या या भूमिकेतून बाहेर पडू इच्छित आहे. होय, शिवगामीदेवीची भूमिका मागे सोडून रम्या आपल्या मॉडर्न लूकमध्ये परतली आहे. ‘जस्ट फॉर वूमन’ या मासिकाच्या कव्हरपेजसाठी रम्याने केलेले फोटोशूट पाहिल्यानंतर तुम्हालाही हेच वाटेल. या कव्हरपेजवरील रम्याचा फोटो बघून, हीच ती राजमाता शिवगामी देवी, हे तुम्हाला सांगूनही पटणार नाही. हा मॉडर्न लूकमधील फोटो रम्याने तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर रम्याने पोस्ट केलेला हा फोटो अनेकांनी लाइक आणि शेअर केला आहे. तुम्हीही तो बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या रम्याने आतापर्यंत तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषिक चित्रपटात काम केले आहे. बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटात रम्या झळकलेली आहे. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दयावान’ या चित्रपटात रम्या दिसली होती. या चित्रपटात तिने एक डान्सरचा कॅमिओ केला होता. १९९३ मध्ये आलेल्या संजय दत्तच्या ‘खलनायक’मध्येही तिने भूमिका साकारली होती.अर्थात ‘चाहत’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटांनी ती विशेष करून ओळखली गेली होती.