Join us
Daily Top 2Weekly Top 5

​श्रीदेवी यांच्या निधनाच्या काहीच दिवस आधी जितेंद्रसोबत त्यांची झाली होती भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 12:08 IST

जितेंद्र आणि श्रीदेवी यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. त्या दोघांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. खरे तर जितेंद्र ...

जितेंद्र आणि श्रीदेवी यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. त्या दोघांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. खरे तर जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्यात २० वर्षांचे अंतर होते. पण प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडायची. श्रीदेवी आणि जितेंद्र त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील खूपच चांगले मित्र होते. जितेंद्र यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, श्रीदेवी यांच्या निधनाच्या काहीच दिवस आधी त्यांची आणि श्रीदेवी यांची भेट झाली होती. श्रीदेवी यांना जितेंद्र नुकतेच भेटले असल्याने श्रीदेवी यांचे निधन झाले या गोष्टीवर त्यांना कित्येक वेळ विश्वासच बसत नव्हता. जितेंद्र सांगतात, श्रीदेवीचे निधन झाले ही गोष्ट मान्य करणेच माझ्यासाठी अशक्य आहे. पंधरा दिवसांपूर्वीच श्रीदेवी आणि बोनी कपूर मला भेटले होते. त्यावेळी आम्ही खूप गप्पा मारल्या होत्या. आम्ही खूप हसलो होतो आणि आता श्रीदेवी या जगात नाहीये, या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीये. मी तिच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले असल्याने तिच्यासोबतच्या अनेक आठवणी माझ्यासोबत आहे. हिम्मतवाला या चित्रपटात श्रीदेवी माझ्यासोबत मुख्य भूमिकेत होती. हिम्मतवाला हा चित्रपट दाक्षिणात्य भाषेत चांगलाच गाजला होता. त्यामुळे हा चित्रपट हिंदी भाषेत बनवण्याचे ठरवण्यात आले. दक्षिणेत जया प्रदाने मुख्य भूमिका साकारली होती. पण श्रीदेवी या चित्रपटाचा भाग असणार असे तिला निर्मात्यांनी आधीच सांगितले होते. त्यामुळे जया प्रदा हिंदी चित्रपटाचा भाग नसणार हे तिला समजवणे एक मोठे काम होते. हे काम त्यावेळी मी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक के राघवेंद्र राव यांनी केले होते. त्या चित्रपटापासून माझी आणि श्रीदेवीची जोडी प्रेक्षकांना भावली आणि आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. Also Read : भूतकाळ विसरून अर्जुन कपूर आणि अंशुलाने दिला जान्हवी, खुशीला आधार