-जुन्या प्रेमाने जॅकलिनला केले ‘आऊट’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 19:39 IST
श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस एका हिट सीरिजमधून आऊट झाल्याची बातमी आहे आणि यामागे आहे जॅकचे जुने प्रेम(??). होय, निर्माता ...
-जुन्या प्रेमाने जॅकलिनला केले ‘आऊट’!
श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस एका हिट सीरिजमधून आऊट झाल्याची बातमी आहे आणि यामागे आहे जॅकचे जुने प्रेम(??). होय, निर्माता साजिद नाडियाडवाला यांची आवडती जॅक आता त्यांचीच हिट सीरिज ‘हाऊसफुल4’मध्ये नसेल. यामागे आहेत, साजिद खान. नाडियाडवाला यांनी साजिद खानकडे ‘हाऊसफुल4’ची जबाबदारी सोपवली आहे. आता जॅक व साजिद खान यांचे कधीकाळी अफेअर होते, हे तुम्हाला ठाऊक आहेच. यानंतर दोघांमध्येही ब्रेकअप झाले. पण दोघांमधील कोल्डवॉर अद्यापही संपलेले नाही. त्यामुळेच ‘हाऊसफुल4’मधून जॅकचा पत्ता कट झाल्याची खबर आहे. ‘हाऊसफुल4’मध्ये अक्षय कुमार व रितेश देशमुख वगळता इतर सर्व स्टारकास्ट बदललेली असेल, असे साजिद खान सध्या सांगत सुटले आहेत. विशेष म्हणजे,‘हाऊसफुल’ सीरिजमध्ये जॅकलिनची एन्ट्री झाली होती ती साजिद खानमुळेच. याचदरम्यान दोघांमध्ये प्रेम फुलले होते. आता साजिदच या सीरिजमधून जॅकला आऊट करताहेत...काळाचा महिमा...आणखी काय??