Join us
Daily Top 2Weekly Top 5

बबली गर्ल जुही चावलाच्या लेकीला पाहिलंत?, आई आहे हुबेहुब कार्बन कॉपी; नेटकरी म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 19:17 IST

सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, जुही चावलीची मुलांना लाइमलाइटमध्ये दूर राहणं पसंत करतात..आपल्या आईसोबत ते कधीच कुठल्या पार्टी वा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत.

जुही चावला तिच्या काळातील सुपरस्टार आहे. तिने त्या काळातील जवळपास सर्वच मोठ्या स्टार्ससोबत काम केले आणि नंतर बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केले. जुही चावलाला जान्हवी मेहता आणि अर्जुन मेहता अशी दोन मुले आहेत. त्याच्या मुलांना लाइमलाइटमध्ये राहणे आवडत नाही. आपल्या आईसोबत ते कधीच कुठल्या पार्टी वा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत. जान्हवीने आपले शिक्षण लंडनमध्ये घेतले आहे. जुही चावलाची मुलगी जान्हवी तिच्या नव्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

जान्हवी आई जुहीसारखी हुबेहुब दिसते. मात्र, जान्हवी मेहताला तिच्या आईप्रमाणे अभिनयात करिअर करायचे नाही. तिला स्पोर्ट्सची आवड आहे आणि तिला लेखक बनायचे आहे. काही दिवसांपूर्वी जुहीने मुलगा अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर केले होते, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये जान्हवी आणि अर्जुन एकत्र दिसले होते. दुसऱ्या एका फोटोत दोघेही त्यांच्या आईसोबत म्हणजेच जुहीसोबत दिसत होते. हे फोटो शेअर करताना जुही चावलाने तिचा मुलगा अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 जुहीच्या मुलीचा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे, 'दुसरी जुही चावला', तर दुसऱ्याने लिहिले आहे की, 'ही अगदी तुमच्यासारखे दिसते मॅडम'.

एका मुलाखती दरम्यान जुही चावलाला विचारण्यात आले होते. जान्हवी मेहता सिनेमात काम करण्याचा विचार करत आहे का? तेव्हा जुहीने उत्तर दिलं की,'जान्हवीला पुस्तक वाचण्याचा छंद आहे. जर तिला काही गिफ्ट द्यायचे असेल. किंवा तिला मनापासून काय आवडते याचे उत्तर पुस्तक हे आहे. तिला लेखक व्हायचं आहे, असे जान्हवी म्हणते.' जूही जान्हवी बद्दल सांगते की,'जान्हवी एका अशा काळात होती तिला मॉडेल व्हायचे आहे. त्यामुळे ती उद्या असे देखील म्हणू शकते की, मला अभिनेत्री व्हायचे आहे. '   

टॅग्स :जुही चावला